मुंबई : एक वर्षापासून सुरु असलेला दहीहंडी उत्सवाचा संभ्रम मिटविण्यासाठी आता थेट राज्य सरकारलाच २० आॅगस्टपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या बैठकीत गोविंदा पथक आणि आयोजकांनी मिळून यासंबधीचा निर्णय घेतला आहे.काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड, संकल्प प्रतिष्ठानचे सचिन अहिर आणि दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे बैठकीला शहर-उपनगरातील तमाम गोविंदा पथकांनीही हजेरी लावली.दहीहंडीबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही, तर मुंबईच्या रस्त्यावर दहीहंडीच्या उत्सवाआधीच थर रचू, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. रेसकोर्सवर कोट्यवधी रुपये उधळले जातात त्याचे काय? आणि गरिबांनी पैसे खर्च करुन उत्सव साजरे केले की पोटात दुखते, असा टोलाही त्यांनी लगावला. दहीहंडीप्रमाणे गिर्यारोहण आणि क्रिकेटमध्येही लोक मृत्युमुखी पडतात, मग त्यावर बंदी का नाही? असा प्रश्नही विचारला. दहीहंडी उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र तरिही सरकार याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडत नाही. आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे हे तर गोविंदा पथकांची फसवणूक करत आहेत, असा आरोप जिंतेद्र आव्हाड यांनी केला. दहीहंडीबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे.
२० आॅगस्टपर्यंत हंडीचा वाद मिटवा
By admin | Published: August 16, 2015 2:18 AM