टर्मिनस झाले, पण समस्या कायम, परळ स्थानकातून जलद लोकलची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:26 AM2019-03-18T05:26:03+5:302019-03-18T05:26:20+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ टर्मिनसची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या गर्दीचे विभाजन जास्त प्रमाणात झाले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे.

 Terminus was done, but the problem persisted, fast local demand from the Parel station | टर्मिनस झाले, पण समस्या कायम, परळ स्थानकातून जलद लोकलची मागणी

टर्मिनस झाले, पण समस्या कायम, परळ स्थानकातून जलद लोकलची मागणी

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ टर्मिनसची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या गर्दीचे विभाजन जास्त प्रमाणात झाले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. परळ टर्मिनस उभारण्यात आला, पण येथे जलद लोकलला थांबा दिल्यावर याचा जास्त वापर केला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
परळ टर्मिनसमध्ये नवीन रेल्वे मार्गिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मार्गिकेहून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या १६ धिम्या फेऱ्या आणि परळ टर्मिनसकडे येणाºया १६ धिम्या फेºया चालविण्यात येत आहेत. या दोन्ही दिशेकडे चालविण्यात येणाºया दोन फेऱ्यांच्या वेळेमधील अंतर जास्त असल्याने परळ टर्मिनसच्या नव्या मार्गिकेचा वापर जास्त होत नाही.
परळ टर्मिनसच्या ठिकाणी अनेक फुल बाजार, बँका आणि रुग्णालये आहेत. त्यामुळे येथे जाणाºया प्रवाशांना परळ टर्मिनसचा जास्त वापर होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांकडून देण्यात आली. मात्र येथे जलद लोकल थांबत नसल्याने उर्वरित प्रवाशांना याचा फायदा होत नाही.
परळ स्थानकावर पूर्वीही लोकल धिम्या लोकल थांबत होत्या, आताही थांबत आहेत. मात्र जलद लोकलने थांबा घेतल्यास आणि परळहून कल्याण दिशेकडे लोकल चालविण्यास सुरुवात केल्यास गर्दीचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होईल, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी दिली.
परळ टर्मिनसची उभारणी केल्याने जास्त प्रमाणात गर्दीचे विभाजन झाले नाही. परळ टर्मिनसची उभारणी आताच झाली असल्याने थोडा अजून काही काळ काय बदल होतील याबाबत लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी सांगितले.
एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर परळ टर्मिनसचे काम वेगाने सुरू झाले़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी परळ टर्मिनसचे उद्घाटन करण्यात आले़ परळ टर्मिनस सुरू झाल्यानंतर दादर स्थानकावर होणारी गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र दादर स्थानकावरील ताण किंचितही कमी झालेला नाही़ परळ स्थानकावरील गर्दीही कमी झालेली नाही़
जलद लोकल गाडी परळ टर्मिनसमधून सुटल्यास याचा नक्कीच फायदा होऊ शकेल़ टर्मिनस सुरू होऊन एक महिना उलटला तरी येथून जलद लोकल का सुरू झाली नाही, असा सवाल प्रवासी करत आहेत़
दादरप्रमाणे परळ स्थानकात मध्य व पश्चिम रेल्वे जोडली गेली आहे़ या परिसरात कॉर्पोरेट कार्यालये अधिक आहेत़ या कार्यालयातील कर्मचाºयांना जलद लोकलसाठी दादर स्थानक गाठावे लागते़ परळ टर्मिनसमधून जलद लोकल सुटल्यास सर्वांनाच फायद्याचे ठरेल़

व्हाया परळ तिकीट मिळत नाही

मध्य रेल्वे मार्गाहून पश्चिम रेल्वे मार्गावर जाण्यासाठी अजूनपर्यंत व्हाया दादर तिकीट मिळत आहे. प्रशासनाने परळ टर्मिनस उभारले. मात्र व्हाया परळ तिकीट मिळण्याची सुविधा सुरू केली नाही. त्यामुळे अनेक प्रवासी दादरहून पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानक गाठत आहे. व्हाया परळ तिकीट मिळाल्यास प्रवासी येथून प्रवास करू शकतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

Web Title:  Terminus was done, but the problem persisted, fast local demand from the Parel station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.