खोपोलीत टायर चोरांची दहशत

By admin | Published: March 17, 2015 10:54 PM2015-03-17T22:54:03+5:302015-03-17T22:54:03+5:30

खोपोलीत टायर चोरीच्या अनेक घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत. शहरातील काही वसाहतींना लक्ष्य करून बंद वाहनांचे टायर चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Terror Thieves of Thieves | खोपोलीत टायर चोरांची दहशत

खोपोलीत टायर चोरांची दहशत

Next

खालापूर : खोपोलीत टायर चोरीच्या अनेक घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत. शहरातील काही वसाहतींना लक्ष्य करून बंद वाहनांचे टायर चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
शास्त्रीनगर, शांतीनगर या भागांतील घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे टायर चोरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला काही तास उलटायच्या आतच देवन्हावे येथूनही बंद गाडीचे टायर चोरीला गेल्याने पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
रविवारी रात्री घराबाहेर उभ्या केलेल्या गाडीचे टायर चोरीला गेल्याचे पाहून अनेकांचे धाबे दणाणले. अज्ञात चोरट्यांनी गाड्यांचे चारही टायर चोरून नेले होते. एकाचवेळी शहरात अशा दोन घटना घडल्याने इतरही कुठे अशी घटना घडली का, याच्या शोधात नागरिक आहेत. गिरनार बिल्डिंगमध्ये राहणारे रमाकांत वसंत दळवी यांच्या इको गाडीचे चारही टायर चोरून नेले होते, तर शांतीनगर येथील संतोष कोलते यांच्या मारुती आल्टो या गाडीचे चार टायरहीचोरांनी पळवले.
एकाचवेळी शहरात अशा दोन घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी दळवी व कोलते यांनी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेला काही तास उलटायच्या आतच देवन्हावे येथील एका हॉटेलसमोर उभ्या करून ठेवलेल्या स्विफ्ट कारचे चार टायर सोमवारी रात्री चोरले. या घटनांमुळे खोपोली आणि खालापूर परिसरात भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)

Web Title: Terror Thieves of Thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.