Join us

दिल्ली पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी मुंबईचा टॅक्सीचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:09 AM

गुन्हे शाखेसह एटीएसच्या पथकाकड़ून कुटुंबियांकड़े चौकशीदिल्ली पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी मुंबईचा टॅक्सीचालकगुन्हे शाखेसह एटीएसच्या पथकाकडून कुटुंबीयांकडे चौकशी...

गुन्हे शाखेसह एटीएसच्या पथकाकड़ून कुटुंबियांकड़े चौकशी

दिल्ली पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी मुंबईचा टॅक्सीचालक

गुन्हे शाखेसह एटीएसच्या पथकाकडून कुटुंबीयांकडे चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (४७) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे. त्याच्या घरी राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक १८५ मध्ये राहण्यास आहे. शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख हा दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे. शेख लहानपणापासून येथे राहण्यास आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर येथील एटीएस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने शेखच्या घरी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी सुरू होती. त्याच्या अन्य नेटवर्कचाही तपास यंत्रणा शोध घेत आहे.