लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थी व शिक्षक यांना व्हॅक्सिन दिल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे केली आहे.
भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारकडे, शिक्षकांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करून लस देण्याची मागणी केली होती, तर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन् यांनी शिक्षकांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करून व्हॅक्सिन देण्याबाबत सूचना केली आहे. मात्र अद्यापही शासन याबाबत निर्णय घेत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे आणि अशा काळात जर लस न देताच परीक्षा घेतल्या, तर आपण लहानग्या विद्यार्थ्यांना कोविडच्या संसर्गात कारण नसताना लोटणार आहोत, असे कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.