आदर्श ग्राम योजनेकडे पालकमंत्र्यांचीच पाठ

By admin | Published: January 2, 2016 08:33 AM2016-01-02T08:33:36+5:302016-01-02T08:33:36+5:30

केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या आदर्श आमदार ग्राम योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करणारे ठाण्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे

Text of Guardian Minister to Adarsh ​​Gram Yojna | आदर्श ग्राम योजनेकडे पालकमंत्र्यांचीच पाठ

आदर्श ग्राम योजनेकडे पालकमंत्र्यांचीच पाठ

Next

- पंकज रोडेकर,  ठाणे
केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या आदर्श आमदार ग्राम योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करणारे ठाण्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी आजमितीस एकही गाव दत्तक घेतलेले नाही. त्यांचाच कित्ता गिरवत आठ आमदारांनीही अजून या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. विशेष म्हणजे यामध्ये राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी वर्णी लावण्याच्या धडपडीत असलेले काही भाजपाचे आमदारही आहेत.
ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी १० आमदारांनी या आदर्श ग्राम योजनेकरिता पुढाकार घेत ग्रामपंचायतींची निवड केली. मात्र, योजना जाहीर झाल्यावर ठाण्याच्या डीपीडीसीमध्ये आमदारांनी गावे दत्तक घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी केले होते. मात्र, अद्यापही शिंदे यांनी एकाही गावाची निवड केलेली नाही.
केंद्र शासनाने आदर्श गाव साकारण्यासाठी ११ आॅक्टोबर २०१४ रोजी आदर्श ग्राम योजना लागू केली. या योजनेच्या धर्तीवर राज्यातील विधानमंडळ सदस्यांनीदेखील ग्रामपंचायतींना ‘आदर्श’ करण्यासाठी आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबत, २० मे २०१५ रोजी तसा आदेश शासनाकडून काढण्यात आला.
आदर्श ग्राम योजनेत प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघातून जुलै २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित करायच्या आहेत. तसेच ग्रामपंचायत निवडताना तेथील लोकसंख्या किमान एक हजार असावी. आमदारांना आपले स्वत:चे किंवा पती किंवा पत्नीचे गाव निवडता येणार नाही. विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर शहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला असेल तर ते मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीची निवड करतील. विधान सदस्यांचा मतदारसंघ जर संपूर्णपणे शहरी असेल तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्याच जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करायची आहे. मुंबई परिसरातील शहरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभा सदस्य राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवड करू शकतात.

जिल्ह्यातील आमदारांनी कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी या तालुक्यांमधील ग्रामपंचायतींना पसंती दिल्याचे दिसते. यामध्ये अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील प्रत्येकी तीन तर भिवंडीतील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

गावे दत्तक घेण्यात शिल्लक असलेले आमदार :
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, रवींद्र चव्हाण, महादू बरोरा, मंदा म्हात्रे, संदीप नाईक, नरेंद्र मेहता, रूपेश म्हात्रे.


पुढाकार घेणाऱ्या आमदारांचा तक्ता
आमदार निवडलेल्या तालुका
ग्रामपंचायतीचे नाव
शांताराम मोरेखांडपेभिवंडी
महेश चौघुलेशेलारभिवंडी
नरेंद्र पवारनांदपकल्याण
डॉ. बालाजी किणीकरउसटनेअंबरनाथ
ज्योती कलानीकांबाकल्याण
सुभाष भोईरखोणीकल्याण
गणपत गायकवाडपोसरीअंबरनाथ
किसन कथोरेघोटसईकल्याण
प्रताप सरनाईकगणेशपूरवर्धा
संजय केळकरकान्होरअंबरनाथ

Web Title: Text of Guardian Minister to Adarsh ​​Gram Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.