कचरा प्रकल्पासाठी सोसायट्यांना मुदतवाढ, अंमलबजावणीकडे फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:39 AM2017-10-03T04:39:16+5:302017-10-03T04:39:25+5:30
महापालिकेच्या चेतावनीनंतरही मुंबईतील ७ ते ८ टक्केच गृहनिर्माण सोसायट्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे, तसेच या सक्तीचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असल्याने, महापालिकेने एक पाऊल मागे घेत,
मुंबई : महापालिकेच्या चेतावनीनंतरही मुंबईतील ७ ते ८ टक्केच गृहनिर्माण सोसायट्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे, तसेच या सक्तीचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असल्याने, महापालिकेने एक पाऊल मागे घेत, कच-यावर प्रक्रिया न करणाºया सोसायट्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, त्यांना मुदतवाढ देऊन आणखी एक संधी देण्यात येणार आहे.
मुंबईवरील कचºयाचा भार कमी करण्यासाठी दररोज शंभर किलोहून जास्त कचरा निर्माण करणाºया सोसायट्या व आस्थापनांना, कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची सक्ती महापालिकेने केली आहे. हा प्रकल्प न उभारणाºया सोसायट्यांमधून कचरा उचलणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, गेल्या चार महिन्यांमध्ये मुंबईतील ५ हजार ३०४ सोसायट्यांपैकी ३७३ सोसायट्यांनीच कचºयापासून खतनिर्मिती प्रकल्प उभा केला, तर गांधी जयंतीच्या निमित्ताने सोसायट्यांच्या स्तरावर ९७ प्रकल्प सोमवारी सुरू झाले आहेत.
प्रकल्प उभारण्याची लेखी हमी देणाºया सोसायट्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मात्र, काही सोसायट्या अद्याप पालिकेच्या इशाºयाला जुमानत नसल्याने, या सोसायट्यांचा कचरा उचलणे २ आॅक्टोबरपासून बंद करण्यात येणार होते, परंतु राजकीय पक्षांकडून विरोध होत असल्याने, सोसायट्यांना अखेर आणखी एक संधी देण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
यांना पाठविणार नोटीस...
मुंबईतील ५ हजार ३०४ सोसायट्यांपैकी ३७३ सोसायट्यांनीच कचºयापासून खतनिर्मिती प्रकल्प उभा केला, तर गांधी जयंतीच्या निमित्ताने सोसायट्यांच्या स्तरावर ९७ प्रकल्प सोमवारी सुरू झाले आहेत.
उर्वरित सोसायट्यांपैकी ज्या सोसायट्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केलेले नाहीत, अशा सोसायट्यांना पुन्हा नोटीस देण्यात येणार आहे, तसेच त्यांना सुधारित मुदत लवकरच कळविण्यात येणार आहे. ही सुधारित मुदत संपल्यावर या सोसायट्यांचा कचरा उचलणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दररोज दोन टन घट अपेक्षित
हा प्रकल्प सक्तीचा केल्यानंतर, कचराभूमीवर नेण्यात येणाºया कचºयात दोनशे टन घट होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाला प्रतिसाद मिळवत, मुंबईत दररोज निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण ७८०० वरून ६ हजार मेट्रिक टनवर आणण्याचे पलिकेचे लक्ष्य आहे.
बेजबाबदार सोसायट्यांवर नजर
कचºयावर प्रक्रिया न करणाºया सोसायट्या नियमांवर अंमल का करीत नाहीत, याचे पालिका निरीक्षण करेल. तूर्तास त्यांच्या अडचणी जाणून घेत, त्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल. यासाठी मंगळवारपासून मोठ्या सोसायट्या व आस्थापनांची पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करतील.
यांचे झाले कौतुक
जुहू विलेपार्ले परिसरात असणाºया नेहरूनगर झोपडपट्टीत, ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करणाºया प्रकल्पाची आयुक्त अजय मेहता यांनी पाहणी केली. सुमारे २५ हजार लोकवस्तीच्या या प्रकल्पात दररोज दोनशे किलो कचºयावर प्रक्रिया होत आहे.
लवकरच या ठिकाणी दररोज दोन हजार किलो कचºयावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. त्यामुळे या झोपडपट्टीमध्ये शून्य कचरा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी लवकरच शक्य होईल, असा विश्वास के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.
100 किलोहून जास्त कचरा निर्माण करणाºयांमध्ये सोसायट्या, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, महाविद्यालये, हॉटेल्सचा समावेश आहे. अशा ५ हजार सोसायट्या व आस्थापना आहेत.
7800 मेट्रिक टन कचºयामध्ये दररोज ३ हजार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जात आहे.
५000 सोसायट्यांनी कचºयावर प्रक्रिया सुरू केल्यास, दररोज १८०० मेट्रिक टन कचºयाचा भार मुंबईच्या कचरा भूमीवरून कमी होणार आहे.