वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:12+5:302021-02-16T04:07:12+5:30

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख लोकमत न्यूज नेटवर्क ...

Of textile industry, machine spinning and handloom weaving | वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या

वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या

Next

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या

मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शासन सकारात्मक असून, यावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध संघटनांनी सोमवारी शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या, त्यावेळी शेख बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रईस शेख, विभागाचे सचिव पराग जैन आदी उपस्थित होते.

या बैठकीत सहकारी संस्थांना बिनव्याजी कर्ज देणे, प्रकल्प अहवालाला मान्यता देणे, कर्जाच्या परतफेडीसाठी मुदतवाढ, सूतगिरण्यांना कापूस गाठीसाठी १० टक्के अनुदान देणे, सहकारी सूतगिरण्यांना वीजदरात सूट तसेच वीजबिलात सवलत, अतिरिक्त जमिनीची विक्री करण्याची परवानगी देणे, यंत्रमाग सहकारी संस्थांसाठी एकरकमी तडजोड (वनटाईम सेटलमेंट योजना) सुरु करणे, साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी धोरण तयार करणे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेसाठी प्रस्ताव पाठविणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

अस्लम शेख म्हणाले की, सहकारी सूतगिरण्यांनी सौरऊर्जेसाठी खासगी सहभाग घेण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. वीज दर व वीजबिलातील सवलतीसंदर्भात ऊर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल. एकरकमी तडजोड योजनेसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल तसेच कापूस खरेदीसाठी अनुदान, अतिरिक्त जमीन विक्रीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागाने सादर करण्याचे निर्देशही शेख यांनी यावेळी दिले.

यड्रावकर म्हणाले की, सहकारी सूतगिरण्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत राज्य शासन व वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.

Web Title: Of textile industry, machine spinning and handloom weaving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.