बनावट सनस्क्रीन लोशन जप्त

By Admin | Published: March 28, 2017 03:47 AM2017-03-28T03:47:43+5:302017-03-28T03:47:43+5:30

घाटकोपरमधून सुमारे एक हजार किलोच्या बनावट सनस्क्रीन लोशनची उत्पादने अन्न आणि औषध प्रशासन

Textured sunscreen lotion seized | बनावट सनस्क्रीन लोशन जप्त

बनावट सनस्क्रीन लोशन जप्त

googlenewsNext

मुंबई : घाटकोपरमधून सुमारे एक हजार किलोच्या बनावट सनस्क्रीन लोशनची उत्पादने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जप्त केली आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या ‘बनाना बोट’ या सनस्क्रीनची  हुबेहुबे नक्कल बाजारात विक्रीसाठी आल्याची मााहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करत बनावट मालासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सनस्क्रीनचा वापर होतो. विशेषत: महिला याचा वापर करतात आणि याचाच फायदा घेत आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या ‘बनाना बोट’ या सनस्क्रीनची हुबेहुबे क्रीम बाजारात विक्रीसाठी आणली होती. कारवाईत सौंदर्यप्रसाधनांसाठी लागणाऱ्या ट्यूब्ज आणि त्या भरण्यासाठी लागणारी यंत्रे आढळली आहे. दरम्यान, सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना ग्राहकांनी सतर्क राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Textured sunscreen lotion seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.