Join us

ठाकरेंनी 'त्यांची' केली लोकसभा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती

By मनोहर कुंभेजकर | Published: February 20, 2024 5:51 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात एकूण 18 लोकसभा मतदार संघापैकी मुंबईत चार लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूक समन्वयक नियुक्त केले आहेत.

मुंबई - येत्या आगामी लोकसभा निवडणूका जिंकण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात एकूण 18 लोकसभा मतदार संघापैकी मुंबईत चार लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूक समन्वयक नियुक्त केले आहेत. शिवसेनेत उलथापालथ झाल्या नातरवसदर अधिकृत नियुक्ती ही प्रथमच होत असल्याने या नियुक्तीला महत्व आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत सुरवातीपासून प्रचारची रूपरेषा आखणे,उमेदवार-शिवसैनिक व पदाधिकारी यांच्यात समन्वय साधणे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा त्या उमेदवाराला आणि पर्यायाने पक्षाला व्हावा हा या निवडणुकी मागचा उद्धव ठाकरे यांचा उद्देश असल्याची माहिती शिवसेनेतील एका जेष्ठ नेत्याने लोकमतला दिली.

27-मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात विलास पोतनीस,28-मुंबई उत्तर पूर्व(ईशान्य मुंबईत) दत्ता दळवी,30-मुंबई-दक्षिण मध्य मध्ये रवींद्र मिर्लेकर तर 31-मुंबई-दक्षिण मध्ये सुधीर साळवी व सत्यवान उभे यांची नियुक्ती केली आहे.

शिवसेनेचे मुंबई पदवीधर मतदारसंघातील आमदार विलास पोतनीस हे शिवसेनेच्या प्रारंभापासूनचे कार्यकर्ते तसेच स्थानीय लोकाधिकार समिती चळवळीतील व सध्याचे कार्यकारी अध्यक्ष असलेले अत्यंत मृदु स्वभावाचे पण शिस्तप्रिय कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे. पोतनीस यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. तसेच उत्तर मुंबईत विभागप्रमुख म्हणून देखील उत्तम कार्य केले आहे. त्याचेच फळ म्हणून २०१८ च्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकीटावर विधानपरिषदेत निवडून गेले. त्यांची जुन्या व नव्या पदाधिका-यांशी सौहार्दाचे संबंध आहेत. आमदार या नात्याने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये चांगला संपर्क व लोकोपयोगी कामे केली आहेत.  शिवसेना नेते सुभाष देसाई,अनिल परब, सुनील प्रभू, रविंद्र वायकर यांच्याशी उत्तम संवाद असलेल्या या नेत्याच्या  अनुभवाचा व सौहार्दपूर्ण संबंधाचा या मतदारसंघात निश्चितच फायदा होईल असे शिवसैनिकांना वाटते.

राजेश शेट्ये, उपविभागप्रमुख वर्सोवा

शिवसेना शिवडी विधानसभा संघटक सुधीर भाऊ साळवी यांची दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९९०  सालापासून ते  शिवसेना पक्षा सोबत प्रामाणिक पणें काम करतात.तसेच विभागातील उत्सव मंडळ, क्रीडा महोत्सव, सामाजिक संस्था याना त्यांच्या मार्फत होणारी मदत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.विभागातील विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये ऍडमिशन साठी तसेच हॉस्पिटल मधील रुग्ण सेवेसाठी मदत करणारा माणूस अशी त्यांची विभागात प्रतिमा आहे.त्यांच्या या प्रतिमेचा फायदा नक्कीच दक्षिण मुंबई मध्ये शिवसेना उमेदवाराला होणार हे निश्चित आहे.

सचिन पडवळ, माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक 206 

टॅग्स :मुंबई