ठाकरे, आव्हाडांनी केली बीडीडीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:09 AM2021-08-23T04:09:22+5:302021-08-23T04:09:22+5:30
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची ...
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. या चाळींच्या पुनर्विकासाचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असून, या कामाचा सातत्याने आढावा घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले, तर पुनर्विकासाचे काम जोरात सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. येथील ६० पयलिंग पूर्ण झाले आहेत. दिलेले शब्द पाळतो आहोत म्हणूनच स्थानिकांचे प्रेम अनुभवतो आहोत. चाळीत झालेले उत्स्फूर्त रक्षाबंधन हे त्याच ऋणानुबंधन आणि प्रेमाचे प्रतीक असल्याचे आव्हाड म्हणाले. यावेळी रक्षाबंधनानिमित्त स्थानिक महिलांनी ठाकरे आणि आव्हाड यांना ओवाळून राखी बांधली. याप्रसंगी सचिन अहिर, आशिष चेंबुरकर, सुनील शिंदे, दत्ता नरवणकर उपस्थित होते.