ठाकरे यांनी केला मानखुर्दच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलांचा सत्कार
By मनोहर कुंभेजकर | Published: March 9, 2024 01:52 PM2024-03-09T13:52:12+5:302024-03-09T13:52:50+5:30
रोजगार मिळवून आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ पाहणार्या या महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व कलकी महिला गृह उद्योग तर्फे सन्मान करण्यात आला.
मुंबई- मानखुर्द,शिवाजी नगर येथील एक पेट्रोल पंप जो संपूर्णपणे महिलांच्या हातात आहे. या 'गुलाबी' पेट्रोल पंपावर, वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यापासून त्याचे व्यवस्थापन बघण्याचे काम येथील सर्व महिलाच करतात.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी येथील सर्व महिलांचा सत्कार केला.
रोजगार मिळवून आर्थिकदृष्टय़ा सक्षम होऊ पाहणार्या या महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व कलकी महिला गृह उद्योग तर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी शालिनी ठाकरे म्हणाल्या की,आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे आहे.मी देशासह जगात अनेक ठिकाणी गेले आहे.परंतू पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यापासून त्याचे व्यवस्थापन बघण्याचे काम येथील महिलाच करतात हे देशातील एकमेव उदाहरण आहे.त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन व त्यांचा सन्मान करण्यासाठी मी येथे आले आहे. तर पहिल्यांदाच आमचे येथे येवून कौतुक केल्याबद्धल येथील महिलांनी शालिनी ठाकरे व मनसेचे आभार मानले.
यावेळी मानखुर्द विभागध्यक्ष जगदिश खांडेकर,मनसे महिला सेना उपाध्यक्षा सुप्रिया पवार,उपाध्यक्षा सुनिता चुरी,सचिव दीपाली माईनव मनसे पदाधिकारी उपस्थित होत्या.