पुणे : राज्यात महाआघाडी सरकार स्थापन होऊन ८-९ महिने झाले तरी मराठा समाजाच्या महत्त्वाच्या विषयांबाबत मंत्रिमंडळातील कोणीही लक्ष घातलेले नाही. समाजाच्या प्रश्नांवर साधी बैठक देखील घेण्यास ठाकरे सरकारलाच वेळ नाही. सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे.
मराठा आरक्षण व समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरूवारी विविध मराठा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मराठा आरक्षणाबाबत समाजात मोठी चिंता आणि काळजी वाढत आहे. मागील सरकारने उच्च न्यायालयाच्या टिकवलेले आरक्षण आपल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवावे म्हणून आम्ही हे आदोलन केले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून या निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेत आहोत. प्रश्न मार्गी नाही लागले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला.या आहेत प्रमुख मागण्यामराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका समजण्यासाठी विधीमंडळाचे २ दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे. सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी न घेता ती कोर्ट पुर्णपणे सुरू होईल तेव्हा घ्यावी.