Join us

'ठाकरे सरकारने महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचे नाव वगळले'

By महेश गलांडे | Published: February 23, 2021 4:21 PM

यंदाच्या यांदीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव नसल्याने नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी वर्तवली आहे.  

ठळक मुद्देठाकरे सरकारने थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले आहे. यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले.

मुंबई - राज्य सरकारकडून दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी जाहीर केली जाते. यंदाही राज्य सरकारने थोर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदाच्या यांदीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव नसल्याने नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी वर्तवली आहे.

ठाकरे सरकारने थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले आहे. यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले. आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात हा विषय लावून धरू, असे यावेळी सर्वांना मी आश्वास्त केले, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.  

राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, 16 फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, 17 सप्टेंबरला केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि 27 डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने दिलेली थोर व्यक्तींची‌ यादी 

सावित्रीबाई फुले जयंती – 3 जानेवारी 2021जिजाऊ माँ साहेब जयंती – 12 जानेवारी 2021स्वामी विवेकानंद जयंती – 12 जानेवारी 2021नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती – 23 जानेवारी 2021बाळासाहेब ठाकरे जयंती – 23 जानेवारी 2021संत सेवालाल महाराज जयंती – 15 फेब्रुवारी 2021बाळशास्त्री जांभेकर – 16 फेब्रुवारी 2021छत्रपती शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी 2021संत गाडगेबाबा महाराज जयंती – 23 फेब्रुवारी 2021संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार) – 27 फेब्रुवारी 2021यशवंतराव चव्हाण जयंती – 12 मार्च 2021शहीद दिन – 23 मार्च 2021महात्मा ज्योतिबा फुले जयंती – 11 एप्रिल 2021डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2021राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती – 30 एप्रिल 2021महात्मा बसवेश्वर जयंती – 14 मे 2021दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस – 21 मे 2021स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती – 28 मे 2021अहिल्यादेवी होळकर जयंती – 31 मे 2021महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)- 13 जून 2021राजर्षी शाहू महाराज जयंती – 26 जून 2021वसंतराव नाईक जयंती – 1 जुलै 2021लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती – 23 जुलै 2021साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती – 1 ऑगस्ट 2021क्रांतिसिंह नाना पाटील जयंती – 3 ऑगस्ट 2021सद्भावना दिवस – 20 ऑगस्ट 2021राजे उमाजी नाईक जयंती – 7 सप्टेंबर 2021केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे – 17 सप्टेंबर 2021 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलसरकारपुणेविधानसभा