Join us

‘’ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट?’’ भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 3:09 PM

Maharashtra News : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनावेळी आझाद काश्मीरचा फलक लावल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या सी समरी रिपोर्टवरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे.

मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनावेळी आझाद काश्मीरचा फलक लावल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या सी समरी रिपोर्टवरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या "हातात" मुंबई पोलिस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार का? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.याबाबत केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, कसाबचा पाहुणचार बिर्याणीने केला, कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो. त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट? आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या "हातात" मुंबई पोलिस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? अशी विचारणा केली आहे. 

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर जेएनयुतील तुकडे गँगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात "काश्मीर मुक्त करा" चे फलक होते त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

टॅग्स :राजकारणउद्धव ठाकरेआशीष शेलारमहाराष्ट्र विकास आघाडीभाजपा