Join us

Maharashtra Politics:ठाकरे गट आणि NCPचे मतभेद उघड! आव्हाडांच्या वक्तव्याचा ठाकरे गटातील 'या' नेत्याने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 2:12 PM

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते, म्हणून राजेंना स्वराज्यरक्षक  म्हणावं असं वक्तव्य पवार यांनी केले होते.

मुंबई-हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते, म्हणून राजेंना स्वराज्यरक्षक  म्हणावं असं वक्तव्य पवार यांनी केले होते. या वक्तव्याचा भाजपने राज्यभर विरोध केला. या वक्तव्यावर काल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता आणि तो क्रूर नव्हता असं वक्तव्य केलं. यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा होता. त्यांनी धर्मवीर संभाजीराजेंना हाल हाल करुन मारले. औरंगजेब क्रुर होता. जितेंद्र आव्हाड काय बोलले मला माहित नाही, असं म्हणत अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 

आमचे विचार वेगवेगळे आहेत. आमचे विचार एकच आहेत असं कोणी सांगितलेले नाही. पक्षा सुद्धा विचार वेगवेगळे असतात. ज्याचा त्याचा विचार आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.    

'अजित पवार यांनी युगपुरुष म्हटले हे चुकीचे नाही. जे युग पुरुष असतात तेच धर्मवीर असतात. औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा होताच, असंही अंबादास म्हणाले.  

"सावरकर-गोळवलकर चुकले आहेत

 अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा सवाल करीत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणार्‍यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजित पवार यांच्यावर टीका करणार्‍यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी दिले. तसेच, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळंशांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही ते म्हणाले.