Join us

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची लाच लुचपत विभागाकडून साडे सात तास चौकशी

By राजेश भोस्तेकर | Published: February 22, 2023 8:24 PM

चौकशीत मी निर्दोष सुटणार, आमदार साळवी यांचा विश्वास

अलिबाग : लाच लुचपत विभागाचे अद्याप ही समाधान होत नाही आहे. अजूनही काही कागदपत्रांची माहिती मागवली आहे. लाच लुचपत विभागाने मागवलेली माहिती १ मार्च रोजी सादर करणार आहे. चौकशीचे ने त्याचे समाधान होत नाही हा त्यांचा किंवा माझा दोष असेल मात्र चौकशीत मी निर्दोष सुटणार असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी चौकशीनंतर कार्यालयाबाहेर आल्यानंतर व्यक्त केला आहे. आमदार साळवी यांची साडे सात तास चौकशी केल्यानंतर सुटका झाली आहे. 

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते बाबत रायगड लाच लुचपत विभागाने चौकशीची नोटीस डिसेंबर महिन्यात पाठवली होती. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी लाच लुचपत कार्यालयात येऊन चौकशीला हजर झाले होते. त्यानंतर २० जानेवारी रोजी मालमत्तेची कागदपत्र घेऊन हजर झाले होते. यावेळी त्याच्या विषयी, तसेच कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती. आमदार साळवी यांनी सादर केलेली कागदपत्रे याचे समाधान न झाल्याने इतर कागदपत्रे सादर करण्यास लाच लुचपत विभागाने सागितले होते. त्यानुसार १० फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सागितले होते. 

त्यानुसार ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी बुधवारी बारा वाजता अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात कागदपत्र घेऊन हजर राहिले होते. साडे सात तास चौकशी झाल्यानंतर साळवी यांना सोडण्यात आले. साळवी हे दोन महिन्यात चार वेळा चौकशीला सामोरे जावे लागले आहे. मात्र अद्यापही लाच लुचपत विभागाचे समाधान झाले नसल्याचे आमदार साळवी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :अलिबागमुंबईउद्धव ठाकरेआमदार