Sanjay Raut News: महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस पराभूत होणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे डम्पिंग ग्राऊंड केले आहे. सध्या आम्ही शांत बसलो आहोत. ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही तर आम्ही ते मान्यच करणार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आव्हान द्यावे. आम्ही तुरुंगात गेलो, ईडीपुढे आम्ही शेपट्या घातल्या नाहीत. अब्दालीचे लोक आमच्या अंगावर आले तेव्हा आम्ही घाबरलो नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा तसेच राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अहमदशाह अब्दाली महाराष्ट्रातील मराठी माणसांमध्ये भांडणे लावतो आहे. सुपारी गँग त्याला बळी पडते आहे. बीडच्या घटनेशी आमचा संबंध नाही हे आम्ही अधिकृतपणे सांगितले, शिवसेनेचा संबंध नाही. तरीही आम्हाला आव्हाने देत आहात. कुणाला आव्हान? तर बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला. काही हरकत नाही. आम्हाला मराठी माणसांमध्ये भांडण लावायचे नाही. कुणी भांडण लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. बघून घेऊ वगैरे धमक्या आम्हाला देऊ नका. सत्ता दोन महिन्यांनी आमच्या हातात येणार तेव्हा तुम्ही कुठे जाल ते आम्ही बघू. हिंमत असेल तर अहमदशाह अब्दालीला आव्हान द्या. महाराष्ट्राची लूट करणाऱ्याला आव्हान द्या. सुपारी गँगला आव्हान द्या, असे आव्हान संजय राऊतांनी दिले.
तुम्हाला तमाशा करायचा आहे ना? आम्ही पण तुमचा तमाशा करु.
तुम्हाला तमाशा करायचा आहे ना? आम्ही पण तुमचा तमाशा करु. एकनाथ शिंदेंचे भाडोत्री लोक मातोश्रीबाहेर नारेबाजी करत होते. सुपारी गँग मंत्रालय, वर्षा बंगला आणि ठाण्यातून चालवली जाते आहे. सगळे भाडोत्री लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पे रोलवर आहेत, असा मोठा आरोप करत, बाकी सगळा मुस्लिम समाज महाविकास आघाडीबरोबर आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.
दरम्यान, मातोश्रीवर जे लोक सुपारी देऊन धाडले गेले ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात किंवा ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी असतात. अकबर सय्यद आंदोलन करत होता. तो मुख्यमंत्र्यांबरोबर आहे बघा. सलमान शेख हा कुणाबरोब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर. त्यानंतर सिद्दीकी नावाचा माणूस हा पण एकनाथ शिंदेंसह असतो असं इस्तियाक सिद्दीकी मातोश्री बाहेर घोषणा देत होता तो मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर होता, असे फोटो दाखवत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले.