“आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”; संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:55 AM2024-03-18T11:55:38+5:302024-03-18T11:56:17+5:30

Sanjay Raut News: आमच्या हातात सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा, असे आव्हान संजय राऊतांनी दिले.

thackeray group mp sanjay raut criticized bjp | “आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”; संजय राऊतांचा इशारा

“आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut News: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क येथील भव्य सभेने झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेत्यांनी भाजपा आणि केंद्रावर सडकून टीका केली. मीडियाशी बोलताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला थेट शब्दांत इशारा दिला. 

शिवतीर्थावर मोठी जनसभा झाली. मोठ्या शक्तीबरोबर लढत आहोत. इंडिया आघाडी महाप्रचार सभा झाली. इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. सर्वांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधी देशातील लोकप्रिय नेते आहे. देश भावी पंतप्रधान पाहत आहे अशी लोकांची भूमिका आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडत आहे , ते झुकत नाही हा त्यांचा बाणा या देशातील लोकांना आवडत आहे. हुकुमशाही पुढे न झुकणारे असे ते आहेत. जे शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही, आम्ही लढणारे लोक आहोत, असे संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितले.

आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल

देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवरून महाविकास आघाडीवर टीका केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल. लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहिती आहे, फक्त त्यांनाच माहिती आहे असे नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा, असे आव्हान संजय राऊतांनी दिले.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरे पळवून मोठा झालेला पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरे नाहीत. ते सर्व फोडलेली पोरे घेऊन बसले आहेत. हे बिन परिवाराचे आहेत का? स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलू नका ते पुन्हा पळून जातील, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

 

Web Title: thackeray group mp sanjay raut criticized bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.