'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 11:34 AM2023-03-23T11:34:34+5:302023-03-23T11:35:47+5:30
राज ठाकरेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अनेक गौप्यस्फोट केले. मला शिवसेनेत प्रमुखपद किंवा कोणतेही पद हवे होते म्हणून बाहेर पडलो नाही. बाहेर पडण्याआधी मी उद्धव ठाकरे यांना विचारले होते की काय हवे ते घ्या; पण, मला माझे काम सांगा. मला बाजूला ठेवले. नाहीतर बाळासाहेबांसमोर मी पक्ष कसा काढला असता, असा सवाल करताना नारायण राणेंनाही शिवसेना सोडायची नव्हती; पण, पक्षातली माणसे बाहेर कशी जातील हेच यांना हवे होते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंचा पक्ष वयात आला आहे. पण त्यांच्या पक्षाचं काय चाललंय माहिती नाही. १८ वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलत आहेत. उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे, भाजपा हे सर्व उद्धव ठाकरेंवरच बोलत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
'अतिशय विद्युत वेगाने कारवाई...'; अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या माहिती समुद्रातील अनधिकृत बांधकामाबाबतचा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांनी विचारला. मात्र यावर कोणतीच प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली नाही. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मागे राज्याची जनता आहे. कोणाला धनुष्य मिळायला कोणाला पक्षाचे नाव मिळालं म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. लोकांचा पाठिंबा असायला पाहिजे, अशी टीकाही संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
दरम्यान, संपूर्ण ही जागा पूर्ववत करण्यात आली आहे. रात्री उशिरा सभा संपल्यानंतर त्यानंतर काही जणांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यामुळे कुणालाही तिथे जाता आले नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासनाने मनुष्यबळ वापरून याठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सदर कारवाईनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणामध्ये यश आणि अपयशचा प्रश्न नाहीय. महत्वाचा मुद्दा हा आहे की, मुंबईमध्ये जर अशाप्रकारे अतिक्रमण होत राहिलं, तर या मुंबईची बजबजपुरी व्हायला वेळ लागणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच अतिशय विद्युत वेगाने जर प्रशासन कारवाई करत असेल, तर राज्य सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो, असं संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
माहीम दर्गा ट्रस्टचा दावा-
माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा ६०० वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम