'४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून...'; मनीषा कायंदे यांच्यावर राऊतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:07 PM2023-06-19T12:07:39+5:302023-06-19T12:23:02+5:30

मनीषा कायंदे यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

Thackeray group MP Sanjay Raut has criticized Shinde group MLA Manisha Kayande. | '४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून...'; मनीषा कायंदे यांच्यावर राऊतांचा निशाणा

'४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून...'; मनीषा कायंदे यांच्यावर राऊतांचा निशाणा

googlenewsNext

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. 

गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात होत असलेला बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण एकनाथ शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केला. केवळ दोषारोप करणे आणि लोक पक्ष सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण न करणे, अशी अनेक कारणे आहेत, असे सांगत यापुढेही अनेकजण इकडे येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. भविष्यातही ठाकरे गटातून शिंदे गटात महिलांचे प्रवेश होतील, असे मनीषा कायंदे यांनी सांगितले. 

मनीषा कायंदे यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून बाई (मनीषा कायंदे) गेल्या असं मी काल व्यासपीठावर ऐकलं. मला त्याबद्दल काही माहिती नाही, मी यावर फार बोलणार नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं. हे लोक येतात कुठून, जातात कसे, हा संशोधनाचा विषय आहे. भविष्यात आम्हाला यावर विचार करावा लागेल, असंही संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. 

एकनाथ शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी-

एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मनीषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनीषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Web Title: Thackeray group MP Sanjay Raut has criticized Shinde group MLA Manisha Kayande.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.