'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:25 PM2023-02-22T14:25:48+5:302023-02-22T14:25:59+5:30

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Thackeray group MP Sanjay Raut has responded to MNS leader Sandeep Deshpande's criticism. | 'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई- मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ट्विट करत एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली. 

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. 

माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, असंही संदीप देशपांडे या पत्राद्वारे म्हणाले. 

संदीप देशपांडेंच्या या टीकेवर संजय राऊतांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. कोण आहे देशपांडे?, त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. तसेच त्यांना आमच्या कुटुंबाबद्दल काय माहिती, अया टोलाही संजय राऊतांनी यावेळी लगावला. 

संदीप देशपांडे यांचे पत्र जसास तसे-

हे येडxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या -हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार... पवार....असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या...नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा !

Web Title: Thackeray group MP Sanjay Raut has responded to MNS leader Sandeep Deshpande's criticism.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.