ठाकरे गटाला धक्का! माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश

By मनोहर कुंभेजकर | Published: July 28, 2023 10:03 PM2023-07-28T22:03:12+5:302023-07-28T22:07:21+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश

Thackeray group's Mangesh Satamkar's public entry into Shinde group | ठाकरे गटाला धक्का! माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला धक्का! माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि तीन वेळा मुंबई महानगर पालिकेमध्ये शिक्षण  सभापती पद भूषवलेले  मंगेश सातमकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.  सातमकर हे १९९४ साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.मुंबई महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड सुद्धा उपस्थित होते.

यावेळी बोलताना सातमकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांच्या कामाची चर्चा करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी तीन वेळा मला भेटून माझ्याशी सर्व विषयावर विस्तृतपणे चर्चा केली. शिवसेनेमध्ये मी गेली ३२ वर्षे काम करत असूनही पक्षप्रमुखांना मला कधी भेटायला वेळ मिळाला नाही. त्यानाच काय त्यांचे निकटवर्तीय पदाधिकारी देखील मला माझ्या अडचणी समजून घेण्यासाठी कधीही भेटले नाहीत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्यानंतर कार्यकर्त्याचे म्हणणे जाणून घेणारा नेता भेटल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

एखादा कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो तेव्हा नेत्याने मागे ठामपणे उभे रहावे अशी त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा अडचणी येतात तेव्हाच नेमकं पाठबळ मिळालं नाही तर मग कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ मिळायचे. अनुभवी कार्यकर्ता घड्यावयला खूप वेळ लावतो मात्र तो गमवायला एक क्षण पुरतो. त्यामुळे शिवसेनेमध्ये मंगेश सातमकर याना पूर्णपणे न्याय देण्यात येईल. तसेच त्यांच्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न राज्य शासनाच्या पुढाकाराने नक्की सोडवले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी आज विधानसभेत १० हजार आणि दुकानासाठी ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.  तसेच उमेद अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांना भरीव मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगितले.  यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी तसेच सातमकर यांच्या प्रभागातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Thackeray group's Mangesh Satamkar's public entry into Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.