'...तर नक्कीच आनंदच होईल'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भास्कर जाधवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:15 PM2022-08-22T15:15:24+5:302022-08-22T15:15:40+5:30

शर्मिला ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Thackeray MLA Bhaskar Jadhav has reacted to Sharmila Thackeray's statement. | '...तर नक्कीच आनंदच होईल'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भास्कर जाधवांचं विधान

'...तर नक्कीच आनंदच होईल'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भास्कर जाधवांचं विधान

googlenewsNext

मुंबई- राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साद घातली तर येऊ देत..मग बघू, असं उत्तर दिलं. शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर पुन्हा एका शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. 

शर्मिला ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे हे काय बोलल्या, ते काही मी ऐकलं नाही. तसेच कोणाच्या घरगुती विषयांबाबत आमच्यासारख्या व्यक्तीनं बोलणं योग्य नाही. मात्र आज ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना सर्व बाजूनं घेरण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. अशावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं महाराष्ट्र उभा आहे. अशावेळेला जर त्यांचे कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, कोणत्याही गोष्टीचा राग मनात न ठेवता जर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहिले, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याचा नक्कीच आनंद होईल, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

उद्या राज्यातील मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी मनसेप्रमुख राज ठाकरे संवाद साधणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेणार असून उद्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज ठाकरेच बोलतील, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. 

Web Title: Thackeray MLA Bhaskar Jadhav has reacted to Sharmila Thackeray's statement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.