शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा काल झाली; आमचेच रेकॉर्ड आम्ही मोडले, ठाकरे गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:17 PM2022-10-06T17:17:07+5:302022-10-06T17:17:41+5:30

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Thackeray MP Arvind Sawant has said that the biggest meeting in the history of Shiv Sena was held yesterday. | शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा काल झाली; आमचेच रेकॉर्ड आम्ही मोडले, ठाकरे गटाचा दावा

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा काल झाली; आमचेच रेकॉर्ड आम्ही मोडले, ठाकरे गटाचा दावा

googlenewsNext

मुंबई- आतापर्यंत रावण दहा तोंडांचा होता, आज तो पन्नास खोक्यांचा खोकासूर आहे; धोकासूर आहे. मी इस्पितळात असताना कट करणारा कटप्पा आहे, या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोरांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा शिवसैनिकाला बसवण्याचा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात हजारो शिवसैनिकांसमोर ते बोलत होते.

आजच्यासारखा अभूतपूर्व मेळावा क्वचितच झाला आहे. मी भारावून गेलो आहे. हे विकत मिळत नाही, अंत:करणापासून प्रेम असलेल्या शिवसैनिकांची ही गर्दी आहे. डॉक्टरांनी अजून परवानगी दिली नसली तरी मी आज तुमच्यासमोर नतमस्तक आहे असे सुरुवातीलाच सांगून ठाकरे हे शिंदे गटाला उद्देशून म्हणाले, की तुमच्या बुडाला आज मंत्रिपदे चिकटली असतील पण कपाळावरील गद्दारीचा टिळा आयुष्यभर पुसता पुसणार नाही.

गेल्या काही वर्षांची तुलना करता उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला आतापर्यंतची सर्वाधिक गर्दी होती, असं सांगण्यात येतंय. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा काल झाली. आमचेच रेकॉर्ड आम्ही मोडले आहेत, असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना किती मजबूत आहे, हे काल दाखवून दिलं, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. 

दरम्यान, शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे एक लाख २५ हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे ६५ हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. 

शिवसैनिकाला पुन्हा मुख्यमंत्री करणारच-

ठाकरे यांनी आपल्याला साथ देण्याचे आवाहन तमाम शिवसैनिकांना केले तेव्हा शिवसैनिकानी हात उंचावले. मी पुन्हा एकदा शिवसैनिकाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून दाखवेन. अंगावर ते आलेच आहेत तर त्यांना शिंगावर घेवूच. दर निवडणुकीत त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस तुमचा कायदा आम्ही गाडून टाकतो!

दसरा मेळाव्यात टोमणे मारा पण कायद्याच्या चौकटीत बोलावे, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाकरेंच्या टार्गेटवर होते. कायदा पाळायचा तर तो सगळ्यानी पाळला पाहिजे. . तुमचे आमदार धमक्या देतात. गोळीबार करतात. हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही गाइन टाकतो. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकर पाळायची हे नाही चालणार, असेही त्यानी सुनावले.

 

 

Web Title: Thackeray MP Arvind Sawant has said that the biggest meeting in the history of Shiv Sena was held yesterday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.