मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात सोमवारी रात्री महापौर बंगल्यात बैठक झाली. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा आढावा आणि राज्य शासनाने भविष्यात करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.लॉकडाऊन संदर्भात राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घ्यावेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ३ मे नंतर काय निर्णय घ्यायचा याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे समजते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपालांच्या भूमिकेविषयीही चर्चा झाली असे समजते.
ठाकरे-पवार यांच्यात महापौर बंगल्यावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 11:20 PM