म्हात्रे प्रकरणावर अंबादान दानवे म्हणाले; "माझ्याकडे 'तो' व्हिडिओ आला, मी पण १० लोकांना पाठवला"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:37 PM2023-03-14T15:37:30+5:302023-03-14T15:37:57+5:30

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला.

Thackeray's Group leader Ambadas Danve has reacted to Sheetal Mhatre's video episode. | म्हात्रे प्रकरणावर अंबादान दानवे म्हणाले; "माझ्याकडे 'तो' व्हिडिओ आला, मी पण १० लोकांना पाठवला"

म्हात्रे प्रकरणावर अंबादान दानवे म्हणाले; "माझ्याकडे 'तो' व्हिडिओ आला, मी पण १० लोकांना पाठवला"

googlenewsNext

मुंबई: शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी राज्यात वादंग निर्माण झाले आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटत आहेत. त्यावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात जुगलबंदी झाली. या प्रकरणात १४ मुलांना अटक केलीय. तो व्हिडिओ खरा की खोटा हे समोर येऊ द्या. रात्री २-२ वाजता पोलीस पोरांना उचलतायेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी सभेत केला. 

मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले. शीतल म्हात्रे, राज प्रकाश सुर्वे यांच्याकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई केली. शीतल म्हात्रे या माध्यमांसमोर रडत होत्या. एखाद्या महिलेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. कुठल्याही स्त्री मनाला हे सहन होणार नाही. रात्री २ वाजता उचलले पण हा तपासाचा भाग आहे. परंतु हे करताना काही वाटलं नाही का?, असा सवाल शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला. 

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला. आमदाराच्या मुलाने त्याच्या फेसबुक पेजवरुन सदर व्हिडिओ डिलीट का केला? हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे हे पोलीस तपासात येईलच. माझ्याकडे देखील हा व्हिडिओ आला, मी देखील १० जणांना पाठवला. व्हिडिओ ओरिजनल असेल तर त्या आमदारांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. सरकार गुन्हेगाराच्या बाजूने आहे की काय अशी स्थिती सध्या राज्यात निर्माण झालीय, असा घणाघात देखील विधान परिषदेत विरोधी पक्षनेते दानवे यांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर केला. 

दरम्यान, आमदार सुर्वेच्या मुलाची तक्रार आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज (२७) याने दहिसर पोलिसात तक्रार दिली होती. ज्यात @bhaiyapatil या द्विटर अकाऊंटवरून त्याला या मॉर्फ व्हिडीओ प्राप्त झाला होता. जो मानस कुवरने शेअर केला. मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत लाऊड स्पीकर आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या गोंगाटात काही ऐकू येत नसल्याने म्हात्रे या सुर्वेच्या जवळ जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, तोच व्हिडीओ मॉर्फ करत घाणेरड्या प्रकारे व्हायरल करण्यात आल्याने माझ्या वडिलांची बदनामी झाली, असे राजने दहिसर पोलिसांना सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Thackeray's Group leader Ambadas Danve has reacted to Sheetal Mhatre's video episode.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.