ठाकूर व्हिलेज ‘प्लॅस्टिकमुक्त’, १ नोव्हेंबरपासून केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:03 AM2017-11-24T02:03:53+5:302017-11-24T02:05:00+5:30

मुंबई : प्लॅस्टिकमुक्तीसाठी कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील पंधरा हजार नागरिक सरसावले असून, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या आता येथील नागरिक, फेरीवाले, दुकानदार वापरत नसल्याचे चित्र आहे.

Thakur Village 'Plastic free', banana resolution since 1 st November | ठाकूर व्हिलेज ‘प्लॅस्टिकमुक्त’, १ नोव्हेंबरपासून केला संकल्प

ठाकूर व्हिलेज ‘प्लॅस्टिकमुक्त’, १ नोव्हेंबरपासून केला संकल्प

Next

मुंबई : प्लॅस्टिकमुक्तीसाठी कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील पंधरा हजार नागरिक सरसावले असून, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या आता येथील नागरिक, फेरीवाले, दुकानदार वापरत नसल्याचे चित्र आहे. ठाकूर व्हिलेज परिसरात १ नोव्हेंबरपासून आपला परिसर ‘प्लॅस्टिकमुक्त’ करण्याचा संकल्प येथील नागरिकांनी केला आहे.
मुंबईत जवळपास ८ हजार ५०० मेट्रिक टन एवढा कचरा रोज बाहेर पडतो. यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण जास्त असते. परिणामी यावर सारासार विचार करत ठाकूर व्हिलेजच्या ‘रेसिडेंट फोरम’ या ग्रुपच्या १२५ सदस्यांनी पुढाकार घेत ‘प्लॅस्टिकमुक्त’ मोहीम येथे प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये ग्रुपमधील सर्व सदस्यांनी स्वत: दीड लाख रुपये जमा करून प्लॅस्टिकऐवजी ४ हजार ५०० कापडी पिशव्या तयार केल्या. जनजागृतीसाठी टी-शर्ट, स्किट, पोस्टर, पत्रके तयार करून सोसायटीमध्ये जनजागृती अभियान सुरू केले. अभियानात येथील १५ हजार नागरिक आणि ७०० फेरीवाल्यांनी सहभाग घेतला आहे.
>पर्यावरणमंत्र्यांकडून कौतुक
प्लॅस्टिकचा कसा दुष्परिणाम होतो, यासाठी व्हिडीओ तयार करून नागरिकांना दाखवण्यात आला. याचे फलित म्हणून आतापर्यंत ६५ ते ७० टक्के नागरिक पुढाकार घेत स्वत: बाजारात कापडी पिशव्या घेऊन जात आहेत. तर नऊ हजार नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. ग्रुपने ४ हजार ५०० कापडी पिशव्या आतापर्यंत बाजारात वितरित केल्या आहेत, अशी माहिती फोरमचे सदस्य निवृत्त कमांडर संदीप श्रीवास्तव यांनी दिली. दरम्यान, या उपक्रमाचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Thakur Village 'Plastic free', banana resolution since 1 st November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.