मुंबई - शहराच्या आठ भागांतील तिवरांच्या प्रदेशातून ३ लाख किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक कचरा उचलण्यात आला आहे. वांद्रे, वर्सोवा, दहिसर, शिवडी, वाशी, ऐरोली, भांडुप, गोराई या ठिकाणांवरील तिवरांच्या प्रदेशातील भाग स्वच्छ करण्यात आला. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, मुंबई मॅनग्रोव्ह सेल युनिट यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली.समुद्रातील आणि नदीतील कचरा तिवरांमध्ये साचतो. त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात कचरा साचून राहतो. या कचºयात जास्त प्रमाण प्लॅस्टिकचे आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या काचेच्या बाटल्या, काच, फे्रम, पोस्टर्स, पिशवी यांचाही समावेश आहे. तिवरांच्या झाडांना वाचविण्याचा व त्यावर आधारित असलेल्या जिवांचा बचाव करण्याचा उद्देश ठेवत ही मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेची सुरुवात १९ नोव्हेंबरपासून करण्यात आली. ३ आठवड्यांत ३ लाखांवर कचरा काढण्यात आला. मोहिमेत १० हजारांहून अधिक विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.आठ दिवस तिवरांच्या प्रदेशात केलेल्या स्वच्छता मोहिमेतून दहिसर येथून २० हजार किलो कचरा, ऐरोलीमधून ३५ हजार किलो कचरा, वाशीमधून १५ हजार किलो कचरा, भांडुपमधून १२ हजार किलो कचरा, बोरीवलीमधून ५ हजार किलो कचरा उचलण्यात आला. वांद्रे आणि गोराई येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व स्थानिक रहिवाशांनी यात सहभाग घेतला. त्यात त्यांनी एकूण ६० हजार किलो कचरा गोळा केला. ऐरोली आणि भांडुपमधून ४५ हजार किलो कचरा उचलण्यात आला. दर आठवड्याला २ ते ३ ट्रक कचरा उचलला जातो.स्थानिकांना तिवरांच्या झाडांचे महत्त्व सांगण्यात आले. प्लॅस्टिकच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी जागृत करण्यात आले, असे मुंबई मॅनग्रोव्ह सेल युनिटचे विभागीय वन अधिकारी पंडित राव यांनी सांगितले.प्रत्येक आठवड्याला आयोजित उपक्रमाला विद्यार्थी व सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक यांचा पाठिंबा मिळत आहे. पर्यावरण रक्षणासाठी आणि प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर होणाºया परिणामाचा एकत्रितपणे अभ्यास करण्यात येत आहे.- सारथी गुप्ता, संयोजक,क्लीन मॅनग्रोव्ह मोहीमनागरिकांनी दाखविलेला उत्साह आणि केलेले काम प्रशंसनीय आहे. तिवरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचे चांगले परिणाम दिसून येतील.- एन. वासुदेवन, मुख्य वन संरक्षक, कांदळवन विभाग
तिवरांना धोका, आठ भागांतून ३ लाख किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक कच-याची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 6:42 AM