‘केईएम’मध्ये आता प्रौढांसाठी थॅलेसेमिया वॉर्ड

By admin | Published: January 14, 2016 03:39 AM2016-01-14T03:39:52+5:302016-01-14T03:39:52+5:30

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असो अथवा आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांचा नेहमीच आधारस्तंभ बनणारे केईएम रुग्णालय आता प्रौढ थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी सज्ज होत आहे.

Thalesamia Ward for adults now in KEM | ‘केईएम’मध्ये आता प्रौढांसाठी थॅलेसेमिया वॉर्ड

‘केईएम’मध्ये आता प्रौढांसाठी थॅलेसेमिया वॉर्ड

Next

मुंबई: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असो अथवा आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांचा नेहमीच आधारस्तंभ बनणारे केईएम रुग्णालय आता प्रौढ थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी सज्ज होत आहे. पुढच्या काही महिन्यांतच केईएम रुग्णालयात प्रौढांसाठी थॅलेसेमिया विभाग सुरू होणार आहे. या विभागाचे प्राथमिक काम सुरू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
थॅलेसेमिया हा एक प्रकारचा रक्ताचा आजार आहे. हा आजार अनुवांशिक आहे. थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर हे थॅलेसेमियाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. जन्मत: बाळाला थॅलेसेमिया मेजर असल्यास जन्मावेळी ही लक्षणे दिसून येत नाहीत. पण साधारण एक वर्षांनंतर त्याची लक्षणे दिसून येतात. थॅलेसेमिया असणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य वाढण्यासाठी रक्त संक्रमण करणे, हा उत्तम पर्याय मानला जातो.
पण थॅलेसेमिया आजार असणाऱ्या काही रुग्णांना आठवड्यातून एकदा अथवा दोनदा रक्ताची गरज भासते. अनेकदा या रुग्णांना रक्त उपलब्ध होत नाही. तर, काही वेळा अनेकदा रक्त संक्रमण करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य बनते. त्यामुळे या व्यक्तींचा आजार बळावू शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
केईएमच्या अकराव्या मजल्यावर प्रौढांसाठी थॅलेसेमिया वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. सध्या येथे ३०० ते ४०० थॅलेसेमिया रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी सुमारे १०० जणांना रक्तसंक्रमणाची गरज भासते. या रुग्णांना आता केईएममध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. रुग्णालयात लहान मुलांसाठी थॅलेसेमियाचा वॉर्ड आहे. पण आता खास प्रौढांसाठी नवीन वॉर्ड सुरू करण्यात येणार असल्याने प्रौढांना याचा नक्कीच फायदा होईल, असे डॉ. सुपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

केईएम रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावर प्रौढांसाठी थॅलेसेमिया वॉर्ड सुरु करण्यात येणार आहे. सध्या केईएम ु्नरुग्णालयात ३०० ते ४०० थॅलेसेमिया रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पैकी सुमारे १०० जणांना रक्त संक्रमणाची गरज भासते. या रुग्णांना आता केईएम रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत.

Web Title: Thalesamia Ward for adults now in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.