ठाणे : आनंद विश्व गुरूकुलच्यावतीने आनंदवन प्रकल्पाच्या मदतीसाठी १०० हून अधिक बहुविकलांग कलाकारांचा कलाविष्कार असलेला स्वरानंदवन हा कार्यक्रम १५ डिसेंबरला डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजिला आहे.बाबा आमटे यांच्या कार्याचा वसा त्यांचे कुटुंबिय पुढे चालवित आहे. त्यांच्या कार्याला आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ.विकास आमटे निर्मित आणि दिग्दर्शित हा वाद्यवृंदाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता होणार आहे. डॉ.तात्याराव लहाने आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यावेळी विशेष उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमाला ठाणेकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदवन प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन महापौर संजय मोरे यांनी केले. (प्रतिनिधी)
आनंदवनच्या मदतीसाठी ठाण्यात स्वरानंदवन
By admin | Published: December 02, 2014 11:22 PM