Join us

ठाणे :२१ हजार २४९ कर्मचाऱ्यांनी शोधले शालाबाह्य विद्यार्थी

By admin | Published: July 04, 2015 11:34 PM

सहा ते १४ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शनिवारी राज्य सरकारने राबविलेल्या मोहिमेत तैनात कर्मचाऱ्यांनी घरोघरीच नाही तर जेथे मुले दिसतील, तेथे त्यांची

ठाणे : सहा ते १४ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शनिवारी राज्य सरकारने राबविलेल्या मोहिमेत तैनात कर्मचाऱ्यांनी घरोघरीच नाही तर जेथे मुले दिसतील, तेथे त्यांची नोंदणी केल्याचे पाहण्यास मिळाले. यासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महापालिका क्षेत्रांसाठी २१ हजार २४९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. प्रत्येक कर्मचाऱ्याला १०० घरांचे टार्गेट दिल्याने सकाळीच बहुतेक घरांची बेल वाजली. त्यामुळे सकाळीच कोण आले, अशी बहुतेकांची धांदल उडाली. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क आहे. मात्र, हजारो मुले शाळाबाह्य आहेत. त्यात विविध पातळ्यांवर शाळाबाह्य मुलांच्या संख्येविषयी संभ्रम आहे. त्यामुळे शाळेबाहेर असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम राबविली गेली. त्यानुसार, आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांकडून घरोघर जाऊन शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेतला. शहरी पट्ट्यात घराघरांप्रमाणेच बस स्थानके, रेल्वे स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, झोपडपट्ट्या, फूटपाथ, रेल्वेमध्ये फिरून या कर्मचाऱ्यांनी माहिती गोळा केली. तर ग्रामीण भागात गावांबरोबरच वाडी, पाडे, तांडे, तमाशा कलावंतांचे पाल, भटक्या जमाती, शेतमळा येथील आणि दुर्गम भागातील आदीवासींच्या मुलांचा शोध घेतला. जिल्ह्यात १८ लाख ८९८ हजार ५८७ कुटुंबे असून त्यांच्या घरोघरी जाण्यासाठी २१ हजार २४९ अधिकारी-कर्मचारी तैनात केले होते.