ठाण्यात ८८ नशेबाज गजाआड

By admin | Published: January 6, 2016 01:53 AM2016-01-06T01:53:44+5:302016-01-06T01:53:44+5:30

ठाण्यातही अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०१५ साली केलेल्या कारवाईवरून हे उघड झाले आहे.

Thane 88 snobbish ghazaad | ठाण्यात ८८ नशेबाज गजाआड

ठाण्यात ८८ नशेबाज गजाआड

Next

पंकज रोडेकर,  ठाणे
ठाण्यातही अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०१५ साली केलेल्या कारवाईवरून हे उघड झाले आहे. २०१५ मध्ये या पथकाने जवळपास ५२ गुन्हे नोंदवून ८८ जणांना अटक केली, तर कारवाईत ४२ लाखांहून अधिकांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकीकडे गुन्ह्यांची आणि अटक आरोपींची संख्या वाढली असली, तरी दुसरीकडे मात्र, जप्त मुद्देमालाची दुप्पटीने घट झाली आहे. या वर्षभरात पोलिसांनी एमडी, चरस, गांजा, टोल्युन सोल्युशन, बनावट नोटा आणि गुटखा या हस्तगत केलेल्या मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडो रुपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे.
ठाणे शहर (गुन्हे) अमली पदार्थविरोधी पथकाने २०१२ मध्ये ०८ गुन्हे दाखल करून, १२ जणांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून १४ लाख ०८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. २०१३ या वर्षी पोलिसांनी ०३ गुन्हे दाखल करून ०८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १६ लाख ०८ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मात्र, २०१४ या वर्षात अमली पदार्थविरोधी अ‍ॅक्ट कायद्यात एमडीचा समावेश झाल्यावर शहर
पोलिसांनी पहिली कारवाई मुंब्य्रात केली होती.
त्या वर्षात गुन्हे जरी जास्त दिसत असले, तरी मुद्देमाल कमी आढळून आला आहे. दुसरीकडे २०१४ पेक्षा २०१५ मध्ये चरसचे प्रमाण वाढल्याचे दिसते. पोलिसांनी १७ किलोहून अधिक चरस जप्त केला.
त्याचबरोबर ५६ किलोहून अधिक गांजा क ारवाई मिळून आला आहे, तर कारवाईत जप्त होणारा अमली पदार्थ मुख्यत: काश्मीर, नेपाळ आणि उत्तरप्रदेश या भागातून आणला जात असल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी
दिली.

Web Title: Thane 88 snobbish ghazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.