पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या दूध विक्रीवर ठाण्यात बंदी

By admin | Published: April 22, 2015 05:58 AM2015-04-22T05:58:22+5:302015-04-22T05:58:22+5:30

जादा दराने दूध विक्र ी करणाऱ्या दूध व्यावसायिकांवर वैध मापन विभागाच्या वतीने जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे.

Thane is banned on the sale of milk by the companies that are exploiting | पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या दूध विक्रीवर ठाण्यात बंदी

पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या दूध विक्रीवर ठाण्यात बंदी

Next

ठाणे : जादा दराने दूध विक्र ी करणाऱ्या दूध व्यावसायिकांवर वैध मापन विभागाच्या वतीने जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे. ठराविक दूध विक्र ी करताना वारंवार कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने या दूधाची विक्र ीच बंद करण्याचा निर्णय आता ठाणे शहर दूध विक्रेते कल्याणकारी संघटनेने घेतला आहे. त्यामूळे ठाण्यातील नागरिकांना २२ एप्रिलपासून पाच नामांकित कंपन्यांच्या दूधापासून वंचित रहावे लागणार आहे.
मुळात, या कंपन्या लीटरमागे नगण्य म्हणजे एक ते दीड टक्का कमिशन या विक्रेत्यांना देतात. त्यात दूध योग्य तापमानात ठेवणे यासह इतर खर्चामध्ये हे कमिशन अत्यंत तोकडे पडते. त्यामुळे अगदी नाईलाजास्तव एमआरपी पेक्षा जादा दराने या दूधाची विक्री करावी लागते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कमिशन वाढवून देण्याची मागणी या गोकूळ, अमूल, वारणा, मदर आणि महानंद या कंपन्यांकडे केलेली आहे. तरी त्यांनी कमिशनमध्ये वाढ न केल्याने आता किमान दहा टक्के कमिशन मिळेपर्यंत या कंपन्यांच्या दूध विक्रीवर शहरात बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दूध विक्रेते संघाचे सह सचिव पांडुरंग तोडणेकर यांनी दिली.
या पाचही दूधाची विक्री बुधवारपासून बंद केली जाणार असल्यामुळे शहरातील सुमारे १२०० विक्रेत्यांनी सुमारे साडे तीन लाख लीटर दूधाची आॅर्डर रद्द केली आहे. त्यामुळे या पाचही कंपन्यांना रोजच्या पावणे दोन कोटींच्या व्यवसायावरही ‘पाणी’ सोडावे लागणार आहे. अर्थात, त्याबदल्यात दुसऱ्या कंपन्यांचे दूध ग्राहकांना उपलब्ध करु न दिले जाणार आहे. एमआरपीपेक्षा जादा दराने दूध विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात गेल्या महिनाभरापासून तक्र ारी वैध मापन विभागाने त्यांच्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पण मूळात दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे तो शीतगृहात ठेवावा लागतो. या शीतगृहाच्या वीजबीलाचे पैसे कंपनीकडून मिळत नसल्याने हा वाढीव खर्च भागविण्यासाठी छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत दुकानदारांकडून घेतली जात असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे सकाळी शीतगृहात न ठेवलेले दूधही वाढीव किंमतीने विकले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी पहाटे आलेले दूध टिकविण्यासाठी सकाळीही शीतगृहाचा वापर करावा लागत असल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thane is banned on the sale of milk by the companies that are exploiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.