ठाण्याचे कॅबिनेट मंत्रिपद एकनाथ शिंदेंमुळे कायम
By admin | Published: December 5, 2014 11:16 PM2014-12-05T23:16:16+5:302014-12-05T23:16:16+5:30
विरोधी पक्षनेतेपदाचा लाल दिवा अल्पकालीन ठरला तरी एकनाथ शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने ठाण्याचे मंत्रिपद कायम राहिले आहे.
ठाणे: विरोधी पक्षनेतेपदाचा लाल दिवा अल्पकालीन ठरला तरी एकनाथ शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने ठाण्याचे मंत्रिपद कायम राहिले आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाडांच्या रुपाने अत्यंत अल्पकाळासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद ठाण्याला मिळाले होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे कॅबिनेट मंत्रिपद पक्के मानले जात होते. पंरतु युती फिस्कटली आणि शिंदेंच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाच्या लाल दिव्याची माळ पडली. त्यांच्यारुपाने ठाण्याचा मोठा गौरवच झाला आहे. कारण यापूर्वी गणेश नाईक, शांताराम घोलप, विष्णू सवरा, राजेंद्र गावीत, शंकर नम, मनिषा निमकर, ताराबाई वर्तक या ठाणे जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिपदे मिळालीत. परंतु ठाणे शहरातल्या आमदाराला मंत्रिपद मिळाले नव्हते. ती उणिव आव्हाडांनी व आता एकनाथ शिंदे यांनी भरून काढली आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम (उपक्रम खाते ) व ठाण्याचे पालकमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत.