Join us

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोना्च्या 446 नव्या रुग्णांची नोंद, 23 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 9:54 PM

सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात 446 नवीन रुग्णांसह 23 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 11 हजार 798 तर, मृतांचा आकडा 391 इतका झाला आहे. 

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात सोमवारी जिल्ह्यात कोरोबानाधित रुग्णांसह या आजाराने मृत्यू होणार्यांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचे दिसून आले. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात 446 नवीन रुग्णांसह 23 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 11 हजार 798 तर, मृतांचा आकडा 391 इतका झाला आहे.    सोमवारी ठाणे महापालिकाहद्दीत सर्वाधिक 141 कोरोना बाधीतांसह आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार 198 तर, मृतांचा आकडा 124 वर पोहोचला. तर, नवी मुंबई महापालिकेत 88 रुग्णांची नोंद झाली असून तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा दोन हजार 974 तर, मृतांचा आकडा 92 इतका झाला आहे. कल्याण – डोंबिवली महापालिकेत 67 रुग्णांची नोंदीसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा एकी हजार 485 तर, मृतांचा आकडा 42 वर गेला आहे. त्यात मीरा भाईंदरमध्ये 46 रुग्णांची नोंदिसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 21 तर, मृतांचा आकडा 59 वर गेला आहे. भिवंडीमध्ये 23 रुग्णांच्या नोंदीसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा 284 तर, मृतांचा आकडा 21 झाला आहे. उल्हानगरमध्ये एका रुग्णांची नोंद आली असून बंधीतांचा आकडा 580 झाला. बदलापूरमध्ये 17 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 326 झाला. तर, अंबरनाथमध्ये 36 रुग्णांच्या नोंदीसह एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून बाधितांचा आकडा 392 तर, मृतांचा आकडा आठवर गेला. ठाणे ग्रामीण भागात 27 रुग्णांची तर एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 529 तर, मृतांचा आकडा 13 झाला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसठाणे