Join us

ठाण्याला ३१ वर्षांनी महिला जिल्हाधिकारी

By admin | Published: November 24, 2014 1:10 AM

आशिया खंडातील सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आतापर्यंत ६० भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिका-यांनी पदभार भूषविला आहे.

पंकज रोडेकर , ठाणेआशिया खंडातील सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आतापर्यंत ६० भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिका-यांनी पदभार भूषविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेपासून ९३ वर्षांत विराजमान झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये (१९८३) फक्त एकच महिला जिल्हाधिकारी ठाण्याला लाभली होती. त्यानंतर, तब्बल ३१ वर्षांनी पुन्हा अश्विनी जोशी यांच्या रूपाने जिल्ह्याला महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा विभाजनानंतर त्या पहिल्याच महिला जिल्हाधिकारी ठरणार आहेत.ब्रिटिशकालीन १९२१ मध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना झाल्यावर पहिले जिल्हाधिकारी म्हणून एस.एम. भरूचा यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर, देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या कालावधीत तब्बल १८ जिल्हाधिकारी झाले. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९४८ च्या दशकात पहिले जिल्हाधिकारी म्हणून जे.बी. बोमन विराजमान झाले होते. त्यानंतर, तब्बल ६८ वर्षांनी म्हणजेच १९८३ मध्ये जिल्हाधिकारी म्हणून डॉ. जे. शंकरन यांच्या रूपाने पहिली महिला जिल्हाधिकारी ठाण्याला लाभली. त्यानंतर, आता तब्बल ३१ वर्षांनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रक अश्विनी जोशी यांच्या रूपाने दुसरी महिला जिल्हाधिकारी ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. १५ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हा विभाजनानंतर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. जिल्हा विभाजनानंतर पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा बहुमानही जोशी यांना मिळाला आहे.