ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात लवकरच २६ कोटींची नुकसानभरपाई, शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 01:48 AM2019-11-29T01:48:37+5:302019-11-29T01:50:24+5:30

ठाणे जिल्ह्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Thane district to compensate farmers for loss of Rs 26 crore soon | ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात लवकरच २६ कोटींची नुकसानभरपाई, शेतकऱ्यांना दिलासा

ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात लवकरच २६ कोटींची नुकसानभरपाई, शेतकऱ्यांना दिलासा

Next

ठाणे - जिल्ह्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापोटी शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यासाठी आठ कोटी २० लाख ६८ हजार रुपये पहिल्या टप्प्यात आले आहेत. त्यातील संपूर्ण रक्कम गुरुवारी संध्याकाळपर्यंत पूर्णपणे वाटप होण्याची अपेक्षा आहे. तर, आगामी चार ते पाच दिवसांत पुन्हा २६ कोटींची नुकसानभरपाई ठाणे जिल्ह्यासाठी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाने शेतकºयांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच पाच हजार ३०० कोटींची भरपाई रक्कम मंजूर केली आहे. त्यातून जिल्ह्यातील शेतकºयांच्या नुकसानभरपाईच्या दृष्टीने दुसºया टप्प्यात २६ कोटी रुपये मिळण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे ३३ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाले आहे.

यापैकी याआधी गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील आठ कोटी २० लाख ६८ हजारांची नुकसानभरपाई प्राप्त झाली. यापैकी सर्वाधिक नुकसान झालेल्या भिवंडी तालुक्याला तीन कोटी तीन लाख ४८ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप झाले. तर, याखालोखाल दोन कोटी २७ लाख ७५ हजार रुपयांचे शहापूरच्या शेतकºयांना गेल्या आठवड्यापासून वाटप सुरू आहे. या तालुक्यांप्रमाणेच अन्यही तालुक्यांतील बहुतांशी शेतकºयांना या पहिल्या टप्प्यातील रकमेचे वाटप झाले.

शेतकºयांच्या नुकसानभरपाईपोटी पहिल्या टप्प्यातील आलेल्या रकमेचे वाटप तहसीलदार कार्यालयाकडून जिल्ह्यात सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत पहिल्या टप्प्यातील आठ कोटी २० लाखांचे वाटप पूर्ण करण्याचे संकेत आहेत. राज्यभरासाठी मंजूर झालेल्या पाच हजार ३०० कोटींतून जिल्ह्यास आवश्यक असलेल्या उर्वरित २६ कोटी रुपये प्राप्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

या प्राप्त होणाºया नुकसानभरपाईची रक्कम उर्वरित शेतकºयांना तत्काळ देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात ठिकठिकाणच्या पातळीवर नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात आॅक्टोबरच्या शेवटच्या व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान अवकाळी पावसामुळे ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.

भिवंडी-शहापूरमध्ये सर्वाधिक भरपाई
जिल्ह्यातील या नुकसानभरपाईपोटी ३३ कोटी ९४ लाख रुपये जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आवश्यक होती. मात्र, पहिल्या टप्प्यात त्यापैकी २५ टक्के म्हणजे आठ कोटी २० लाख ६८ हजार रुपये मिळाले.
या पहिल्या टप्प्यातील ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी तालुक्यांतील शेतकºयांना नुकसानीच्या दृष्टीने समान वाटपाचे नियोजन केले आहे.

या निकषास अनुसरून भिवंडी व शहापूर या तालुक्यांना सर्वाधिक रकमेचे वाटप झाले. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात एक कोटी ९८ लाख २५ हजार रुपयांचे, तर अंबरनाथ तालुक्यातील शेतकºयांना प्रथम ५७ लाख रुपयांचे वाटप झाले.
कल्याण तालुक्यात ३० लाख ५० हजार आणि ठाणे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे तीन लाख ७० हजार रुपये गेल्या आठवड्यापासून वाटप झाले.

Web Title: Thane district to compensate farmers for loss of Rs 26 crore soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे