Join us

ठाणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Published: March 29, 2015 12:04 AM

जिल्ह्यात वाढत्या तापमानाने लाही लाही होत असतानाच शनिवारी सायंकाळी ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वादळीवाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस पडला.

ठाणे : जिल्ह्यात वाढत्या तापमानाने लाही लाही होत असतानाच शनिवारी सायंकाळी ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वादळीवाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस पडला. ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटात पडलेल्या या पावसाने ग्रामीण भागाला झोडपून. यात शहापूर तालुक्यातील दांड-उंभ्रावणे येथील सविता अंकुश कुरणे (१८) या तरुणीचा वीज पडून मृत्यू झाला. तिच्यासोबतच्या काही मुली या दुर्घनेत सुदैवाने बचावल्या.शहापूर, मुरबाड, वाडा, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यांच्या ग्रामीण भागात मागील तीन दिवसांपासून गारांसह अवकाळी पाऊस पडत आहे. शनिवारी सायंकाळी देखील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही गावांमधील घरांवरील पत्रे उडाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. वासिंद, अंबिवली या भागात गारांचा पाऊस पडला. यामुळे भाजीपाला, आंबा, चिकू, काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह विजेच्या गडगडाने शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीचा बळी घेतला. कसाऱ्याजवळ असलेल्या उंभ्रावणे या गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने या गावातील सविता अंकुश पुराणे ही १८ वर्षीय तरुणी आपल्या सहमैत्रिणींसोबत पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली असता संध्याकाळी ४.३० च्या सुमारास अचानक जोरदार वारा तसेच विजेच्या लखलखाटाने सविता व तिच्या मैत्रिणी पाणी घेऊन परत येत असताना तिच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्यावर वीज कोसळली. यात विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला, तर इतर मैत्रिणी थोडक्यात बचावल्या. सविताला तत्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल, परंतु ती तत्पूर्वीच गतप्राण झाली होती. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमधून मयत सविताच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत जाहीर केली असून त्यांना शासनस्तरावर मदत मिळवून देणार असल्याचे शहापूरच्या तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी जाहीर केले.शिरोशी येथे जोरदार वादळी पाऊस पडला. या वादळी वाऱ्यामुळे पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या अवकाळी पावसामुळे परिसरातील पळू, सोनावळे, शिगापूर, माळशेज, सावर्णे, न्याहडी, शिरोशी, टोकावडे इत्यादी परिसरातील भाजीपाला व शेतीचे नुकसान झाले. च्वाडा : शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली़ तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. या वेळी वादळाने घरावरील पत्रेही उडवून नेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.च्दुपारच्या सुमारास तालुक्यातील ३७ अंश से. तापमान होते. मात्र अचानक आलेल्या पावसाने हवेत गारवा आला. विजापूर कोने परिसरातील गारांचा पाऊस पडला. तर आबिट घर येथील अतुल गोतारणे यांच्या दुकानावरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. च्दुपारेपाडा येथील पोल्ट्रीवरील छत, गातेस येथील गोपाळ पाटील यांच्या घरावरील पत्रे, नेहरोली येथील माध्यमिक शाळेवरील पत्रे तसेच आरोग्य उपकेंद्रावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडविल्याने मोठे नुकसान झाले आहे. नेहरोळी चिखले रस्त्यात मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक रात्रीपर्यंत बंद होती.वीज पडून तरुणी ठारनाशिक : इगतपुरीसह मालेगाव, ब्राह्मणगाव, देवळा, कळवण भागात शनिवारी अवकाळी पाऊस झाला. कसारा घाटात दांड उमरावने येथील कविता अंकुश पुराने या तरुणीचा विहिरीवर पाणी भरत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. अवकाळीने पिकांचे नुकसान झाले.