ठाणो जिल्ह्याला पावसाने झोडपले
By admin | Published: July 30, 2014 02:05 AM2014-07-30T02:05:36+5:302014-07-30T02:05:36+5:30
रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारीही जिल्ह्यास झोडपून काढल़े
Next
ठाणो : रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारीही जिल्ह्यास झोडपून काढल़े जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, भातसा, वालधुनी, उल्हास, काळू, शाई या नद्या ओसंडून वाहत असून मोडक सागर धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. यामुळे वैतरणा नदीच्या काठावरील वाडा तालुक्यातील 29 गावपाडय़ांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे ठाणो जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सांगितले.
कल्याण- डोंबिवलीनजीकच्या कोपरगावातील 7क् कुटुंबांना स्थलांतरित केले आह़े शिवाय पालघर तालुक्यात एकजण वाहून गेला असून, ठाण्यातील कळवा भागात एक मुलगा बुडाल्याचे वृत्त असून वाडा-कुडूस भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या़
शहापूर तालुक्यात काही गावांत भातसाचे पाणी घरात शिरले असून वीज, बीएसएनएलची सेवाही ठप्प झाली आह़े मोडक सागर धरणाच्या पाण्याच्या पातळीची क्षमता 535 मीटर आहे. यापैकी 529 मीटर पातळी धरणाने गाठली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता शहापूर तहसीलदारांनी व्यक्त केली. यामुळे धरणातील ज्यादा पाणी वेळीच सोडावे (विसर्ग) वैतरणा नदीपात्रत सोडावे लागणार आहे.
येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या दृष्टीने आधीच शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणांची पाहणी करून नियोजन करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहे. उद्या आणि परवा पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पालघर तालुक्यातील पंकज चंदू बंबारडे (1क्) याचा नाल्याला आलेल्या पुरात बुडून मृत्यू झाला. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दीर्घकाळ खोळंबली. याशिवाय सूर्या नदीसह उल्हासनदी, भातसाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय जिल्ह्यातील काळू, शाई आदी मोठय़ा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
सततच्या या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, लोकल गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे सुमारे 2क् मिनिटे गाडय़ा उशिराने धावत होत्या. तर नदीनाल्यांना पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा कोलमडली. जिल्ह्यात मागील 24 तासांच्या कालावधीत 2575 मिमी विक्रमी पाऊस पडला आहे. हा सरासरी 183.99 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
पाणी शहरात शिरले
च्भिवंडी : शहर व परिसरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रलगत असलेल्या खाडीतील घाण साफ न केल्याने व कामवारी नदीतील गाळ न काढल्याने पावसाचे पाणी सोमवारी सकाळी शहरांत शिरले.
च्अंबिकानगर, शिवाजीनगर, नझराणा कम्पाउंड, अजयनगर, ठाणगे आळी, भाजी मंडई, शिवाजी चौक, म्हाडा कॉलनी, नदीनाका, शेलार, इदगाह रोड, कारीवली रोड आदी ठिकाणी पाणी साचून दीर्घकाळ रहदारी बंद झाली. तसेच शहरालगत खाडीपूल व खोणीपुलावरून पाणी गेल्याने पलीकडील गावांचा संपर्क तुटला. कचेरीपाडय़ात कम्पाउंडची भिंत कोसळली, तर गायत्रीनगरमध्ये झाड कोसळले. सुदैवाने कुठेही अनुचित घटना घडली नाही.
भुयारी गटाराचे पाणी इमारतीत
बदलापूर : येथील भुयारी गटाराचे काम पूर्ण न झाल्याने कात्रप परिसरातील इमारतीच्या आवारात पाणी साचल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पालिका प्रशासन दाद घेत नसल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे.
कात्रप परिसरातील शिवधाम सोसायटीच्या आवारात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेले. या परिसरातील भुयारी गटारांचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नाल्यातील पाणी शिवधाम परिसरात शिरले आहे.
कल्याण : गेल्या 24 तासांत 81 मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी कोपरगावात पावसाचे बैठय़ा चाळीत पाणी शिरल्याने सुमारे 7क् जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सकाळी पालिकेच्या ब प्रभागात उंबर्डे गावाजवळ सम्राट अशोकनगरमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या. पालिकेच्या आपत्ती निवारण पथकाने पाण्याचा निचरा केला. पावसाने कल्याणची खाडी, गंधारी नदी यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
वाडा, कुडूसमध्ये
शाळा बंद ठेवल्या
च्कुडूस : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची चाळणी झाली असून वाडा, भिवंडी महामार्गावर काही ठिकाणी रस्ता वाहून गेला, तर मोठे खड्डे झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. वाडा, कुडूस परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला.