खडड्यांमुळे ठाणे मॅरेथॉन राज्यस्तरीय

By Admin | Published: July 3, 2016 03:13 AM2016-07-03T03:13:50+5:302016-07-03T03:13:50+5:30

मागील २६ वर्षे सातत्याने ठाण्यात रंगणारी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा फुल्ल मॅरेथॉन स्पर्धा व्हावी, यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, रस्त्यांवरील खडड््यांबाबत आयोजक साशंक

Thane marathon state level due to rocks | खडड्यांमुळे ठाणे मॅरेथॉन राज्यस्तरीय

खडड्यांमुळे ठाणे मॅरेथॉन राज्यस्तरीय

googlenewsNext

- अजित मांडके,  ठाणे

मागील २६ वर्षे सातत्याने ठाण्यात रंगणारी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा फुल्ल मॅरेथॉन स्पर्धा व्हावी, यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, रस्त्यांवरील खडड््यांबाबत आयोजक साशंक असल्याने अखिल भारतीय स्तरावर होणारी ही स्पर्धा आता राज्य पातळीवरच ठेवण्याची नामुश्की आयोजकांवर ओढवली आहे. अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा घेताना येणारा खर्च, त्याचे आॅडिट, आयोजन आदींनादेखील तोंड देण्याची वेळ येऊ शकते. यामुळेच फुल्ल मॅरेथॉनमधून आयोजकांनी माघार घेतली. ती २८ आॅगस्टला होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
मागील वर्षी ठाणे महापालिकेने ही स्पर्धा खाजगी इव्हेंट मॅनेजमेंटच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, प्रयत्न करूनही ते शक्य न झाल्याने अखेर पालिकेनेच काही खाजगी प्रायोजकांच्या मदतीने ती पार पडली होती. खर्चाचा भार लक्षात घेता यंदाही ती खाजगी प्रायोजकांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्पर्धा यंदा राष्ट्रीय स्तरावर घेण्याचा निर्णय सुरुवातीला झाला. ती फुल्ल मॅरेथॉन अर्थात ४२ किमीची होणार होती. तर, महिलांसाठीचे अंतर २१ किमी असणार होते. त्यानुसार, याच्या खर्चाचा आराखडाही तयार केला होता. हा खर्च कोटीच्या घरात जाणार होता. यासंदर्भातील वृत्त लोकमतने मागील महिन्यातच दिले होते. परंतु, खर्चाचे आॅडिट, आयोजनातील संभाव्य त्रुटी आदींसह येणाऱ्या खेळाडूंची व्यवस्था आदींचाही व्याप वाढणार होता. त्यामुळे यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत जोरदार चर्चादेखील झाली.
मागील वर्षी मॅरेथॉनपूर्वी खड्डे बुजवण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. त्यानुसार, खड्डेदेखील भरले गेले. परंतु, घोडबंदर मार्गावर रस्त्यावरील एका खड्ड्यात महिला खेळाडूंसह इतर खेळाडूही जखमी झाले होते.

४२ किमीची म्हणजेच फुल्ल मॅरेथॉन ठेवली, तर या खडड््यांचा अडथळा आणखी वाढू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात आली. शहरात एवढे हायटेक रस्ते असताना त्यावर खड्डे पडणे, ही नित्याचीच बाब असल्याने यावर गंभीर चर्चा झाली आणि अखेर फुल्ल मॅरेथॉनचा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला.

Web Title: Thane marathon state level due to rocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.