ठाणे महापालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारीचे अर्धे युध्द जिंकले, सर्व्हे केलेल्या १९ लाख ४८ हजार १०२ जणांची होणार आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:30 PM2020-10-17T12:30:30+5:302020-10-17T12:30:59+5:30
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत ठाणे महापालिकेने पहिला टप्पा यशस्वी पार केला असून यामध्ये तब्बल १९ लाख ४८ हजार १०२ नागरीकांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. आता दुसºया टप्यात या नागरीकांच्या आरोग्याची योग्य ती खरबदारी पालिका घेणार आहे.
ठाणे : ठाणे महानगर पालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाचा पहिला टप्पा सफलतापूर्वक पूर्ण केला आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात सर्वेक्षणाचा मोठा पल्ला गाठला आहे. यामध्ये पालिकेने तब्बल १९ लाख ४८ हजार १०२ जणांचा सर्व्हे करण्याचे धनुष्य पेलण्याचे काम केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात आधीच्या सर्व्हेमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना उपचाराच्या कक्षेत आणले जाणार आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या वतीने राज्य सरकारने दिलेल्या निर्देशनानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी, अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता ९ आॅक्टोबर रोजी झाली. पहिल्या पंधरवड्यात केलेल्या सर्व्हेमध्ये पालिकेने रोज सरासरी ८० ते ९० हजार लोकांचा सर्व्हे केला. सात लाख ७ हजार ९४६ कुटुंबाचा सर्व्हे करून या कुटुंबातील १९ लाख ४८ हजार १०२ जणांच्या पालिकेकडे नोंदी करून घेतल्या. यासाठी रोज ५०० - ५५० जणांचे पथक हे लोकांच्या घरोघरी जाऊन हे काम करीत होते. या सर्व्हेत भेटी दिलेल्या कुटुंबियांची पूर्ण माहिती नोंद करून घेण्यात आली असून आता दुसर्या टप्प्यात अगोदर भेटी दिलेल्या कुटुंबांना भेटून त्यांच्या कुटुंबातील आजारी माणसांची माहिती घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भेटी दिलेल्या व्यक्तींना भेटून १५ दिवसांत त्यांच्या घरात कोणी आजारी पडले आहे का अथवा कोणाला काही लक्षणे आढळून आली आहेत का याची माहिती घेतली जाणार आहे. तसे कोणी आढळल्यास त्याला आवश्यक ती मदत केली जाणार आहे. पालिकेकडे पहिल्या सर्व्हेत या कुटुंबातील सगळ्यांची नोंदणी झाल्याने त्यांच्या आरोग्यवर लक्ष ठेवणे, पुढील फॉलोअप करणे सोपे जाणार आहे. पहिल्या टप्प्यात चांगले काम झाले असून आता दुसºया १० दिवसांच्या टप्प्यात सर्व्हे करण्यात आलेल्या कुटुंबांपर्यंत जाऊन त्यांची आरोग्य विषयक माहिती घेणे अधिक सोपे जाणार आहे. गुरु वार १५ आॅक्टोबर पासून ठाण्यात माझे कुटुंब माझी जबादारी, अभियानाचा दुपार टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा १५ दिवसांचा असणार आहे. दरम्यान या सर्व्हेत आढळून आलेल्या कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर सुद्धा रु ग्णांना सर्वोपतरी मदत केली जात आहे. या १५ दिवसांच्या काळात पालिकेच्या पथकांनी ६० हजारांहून अधिक इतर आजारांचे रु ग्ण शोधून त्यांनाही आवश्यक ते सल्ले देऊन मदत केली आहे.