ठाणो पालिका लावणार मॉलला व्यावसायिक कर
By admin | Published: June 25, 2014 01:04 AM2014-06-25T01:04:46+5:302014-06-25T01:04:46+5:30
शहरातील काही बडय़ा मॉलचे व्यवस्थापन वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागांमध्ये बिनदिक्कत व्यावसायिक गाळे, हॉटेल चालवित
Next
>ठाणो : शहरातील काही बडय़ा मॉलचे व्यवस्थापन वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागांमध्ये बिनदिक्कत व्यावसायिक गाळे, हॉटेल चालवित असून पालिका त्यांच्याकडून वाणिज्य वापराचा कर वसूल करीत नसल्याची बाब मंगळवारी स्थायीच्या बैठकीत उघड झाली. वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागेचा इतर कुठलाही व्यावसायिक वापर करता येत नाही. तरीही पूर्व द्रुतगती महामार्गावर व्यवसाय थाटून बसलेल्या मॉलमध्ये वाहनतळांच्या जागेचा बेकायदा व्यावसायिक वापर सुरू आहे. या गाळ्यांना पार्किग दरानुसार तुरळक दराने मालमत्ता कराची आकारणी होत असल्याची माहिती पुढे आली. वाहनतळाच्या अतिशय माफक दराने सुरू असलेली करआकारणी मागे घेतली जाईल आणि जुन्या कराची वसुलीही व्यावसायिक दराने केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.