‘ठाणे काल, आज आणि उद्या’ची रुपरेखा

By admin | Published: October 8, 2015 12:30 AM2015-10-08T00:30:35+5:302015-10-08T00:30:35+5:30

लोकमतच्या काहीतरी कर ठाणेकर, या चळवळींतर्गत ठाणे काल, आज आणि उद्या या चर्चात्मक कार्यक्रमाचे ९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सहयोग मंदिर येथे आयोजन केले आहे.

'Thane period, today and tomorrow' outline | ‘ठाणे काल, आज आणि उद्या’ची रुपरेखा

‘ठाणे काल, आज आणि उद्या’ची रुपरेखा

Next

ठाणे : लोकमतच्या काहीतरी कर ठाणेकर, या चळवळींतर्गत ठाणे काल, आज आणि उद्या या चर्चात्मक कार्यक्रमाचे ९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सहयोग मंदिर येथे आयोजन केले आहे. ठाणे शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. निसर्गाने वेढलेले ठाणे ते मॉल संस्कृतीने बहरलेल्या ठाण्याचा प्रवास शहराने केला आहे.
शहराचा हा बदलता चेहरा अनेक ठाणेकरांनी जवळून बघितला आहे. इतकेच नव्हे तर शहर अद्ययावत बनविण्यासाठी अनेकांचे हातभार या शहराला लाभले आहेत. यानिमित्ताने ठाणे काल, आज आणि उद्या कसे असावे, याचा एक परिसंवाद घडवून आणला जाणार आहे.
यासाठी ठाण्याची ओळख असणारे किंबहुना शहराला नवीन चेहरा देणाऱ्या मान्यवरांना लोकमतच्या माध्यमातून आमंत्रित केले असून ठाणेकरांनी या परिसंवादाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८६५२२००२२६ किंवा ९८७०९१२२३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

सहभागी मान्यवर
संपदा जोगळेकर-कुलकर्णी - अभिनेत्री
रवींद्र प्रभुदेसाई - पितांबरी
विजू माने - दिग्दर्शक
सुदीप नगरकर - लेखक
रोहितभाई शहा - टिपटॉप
मुकुंद नातू - बिल्डर
रविराज अहिरराव - वास्तुशास्त्रज्ञ
मुलाखतकार अभिनेता -
विघ्नेश जोशी

Web Title: 'Thane period, today and tomorrow' outline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.