Thane: मुंब्र्यात टोरंट कंपनीच्या विरोधात आंदोलन
By कुमार बडदे | Published: June 24, 2024 06:54 PM2024-06-24T18:54:49+5:302024-06-24T18:55:20+5:30
Thane News: कळवा, मुंब्रा आणि शिळ परीसरात वीज वितरण करत असलेल्या टोरंट कंपनीच्या विरोधात समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष अब्दूल मन्नान शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले.
- कुमार बडदे
मुंब्रा - कळवा, मुंब्रा आणि शिळ परीसरात वीज वितरण करत असलेल्या टोरंट कंपनीच्या विरोधात समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष अब्दूल मन्नान शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले.भारत गिअर कंपनी समोर असलेल्या कंपनीच्या कार्यालया बाहेर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष केले जाते.तक्रार ऐकण्यासाठीत्यांना नाहक ताटकळत ठेवले जाते.कंपनी लावत असलेले विद्युत मीटर फाँल्टी असल्यामुळे भरमसाठ वीज देयके येत असल्याचा आरोप शेख यांनी केला.या कंपनी ऐवजी दुस-या कंपनीला वीज वितरण करण्याचे अधिकार बहाल करण्यात यावेत.अशी मागणी यावेळी करण्यात आली, आंदोलन कर्त्यांनी कंपनीच्या विरोधात यावेळी घोषणा दिल्या .या आंदोलना नंतरही कंपनीच्या वागणूकीत बदल न झाल्यास मुख्य रस्त्यावर उतरुन चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.