ठाण्यातील ‘ते’ रिक्षाचालक गजाआड

By admin | Published: June 15, 2017 12:23 AM2017-06-15T00:23:57+5:302017-06-15T00:23:57+5:30

धावत्या रिक्षात युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रिक्षाचालकांना ठाणे पोलिसांनी अखेर बुधवारी गजाआड केले. ११ पथकांकडून सलग आठ दिवसांचा

In Thane, the 'rickshaw driver' | ठाण्यातील ‘ते’ रिक्षाचालक गजाआड

ठाण्यातील ‘ते’ रिक्षाचालक गजाआड

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : धावत्या रिक्षात युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रिक्षाचालकांना ठाणे पोलिसांनी अखेर बुधवारी गजाआड केले. ११ पथकांकडून सलग आठ दिवसांचा तपास आणि जवळपास दोन हजार रिक्षाचालक-मालकांची कसून चौकशी केल्यानंतर पोलीस यंत्रणा आरोपींपर्यंत पोहोचू शकली.
७ जून रोजी रात्री ९.४० वाजताच्या सुमारास तीनहातनाका येथून घरी जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलेल्या एका तरुणीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न या रिक्षामध्ये चालकाच्या गणवेशात मागे बसलेल्या एका सहप्रवाशाने केला होता. युवतीने प्रतिकार करताच आरोपीने तिला मारहाण करून पोखरण रोड क्रमांक २वर रिक्षातून ढकलले होते. ठाण्यात खळबळ उडवणाऱ्या या घटनेच्या तपासाकडे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी स्वत: लक्ष ठेवून होते. जवळपास दोन हजार रिक्षाचालक-मालकांची चौकशी, ठिकठिकाणच्या सीसी कॅमेऱ्यांच्या फुटेजची पडताळणी आणि शक्य ते सर्व पर्याय तपासले जात असताना, लुईसवाडीतील एक रिक्षाचालक काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी यांना मिळाली. संतोष नामदेव लोखंडे हा रिक्षाचालक ८ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात केली होती. अधिक तपासाअंती तो १२ जून रोजी यकृताशी संबंधित आजारामुळे ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा फोटो मिळवून तो पीडित युवतीला दाखवला असता तिने आरोपीला ओळखले. आरोपी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन फरार होण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली. वागळे इस्टेटमधील ज्ञानेश्वरनगरातील लहू घोगरे याच्या मदतीने आपण हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर, पोलिसांनी त्याच्याच मदतीने लहू घोगरेच्या अटकेसाठी त्याच्या घराजवळ सापळा रचला. घोगरे रिक्षा घेऊन येताच पोलिसांनी त्यालाही अटक केली.
दोन्ही आरोपी एकमेकांचे परिचित आहेत. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्यांच्यावर आधीचे किरकोळ स्वरूपाचे काही गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या वेळी दोघेही दारूच्या नशेत होते.

खबरदारी म्हणून दिलेल्या तक्रारीमुळेच अडकले
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संतोष लोखंडेच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दिली होती. लोखंडेवर कुणी संशय घेऊ नये, या उद्देशाने त्याच्या पत्नीने ही तक्रार दिली होती. पोलिसांनी विचारणा केलीच, तर पती बेपत्ता आहे, तशी रीतसर तक्रार दाखल केल्याचे सांगता यावे, हा त्यामागचा हेतू होता. मात्र या तक्रारीमुळेच पोलिसांचा संशय बळावला आणि बेपत्ता लोखंडेचा शोध सुरू झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर फरार होण्याची तयारी लोखंडेने केली होती. तत्पूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: In Thane, the 'rickshaw driver'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.