जितेंद्र कालेकर, ठाणेकार्तिकी एकादशीनिमित्त ठाणे जिल्ह्यातून राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) ५२ जादा बसेस सोडल्या होत्या. त्याद्वारे आठ आगारांमधून २२३ फेऱ्यांद्वारे १७ हजार २०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यामुळे एसटीच्या गल्ल्यात २५ लाख ८५ हजारांची भर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयातर्फे नुकत्याच झालेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त जादा गाड्यांचे नियोजन केले होते. त्यासाठी १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ठाणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते ठाणे जाणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. ठाणे-१ आगारातून ३६, ठाणे-२ मधून ३५, भिवंडीतून १२, शहापूर ३४, कल्याण १४, मुरबाड २६, विठ्ठलवाडीतून ८ तर वाडा आगारातून ५८ अशा एसटीच्या पंढरपूरसाठी २२३ फेऱ्या करण्यात आल्या. यातील काही माळशेज तर काही खंडाळामार्गेही नेण्यात आल्या होत्या.
ठाणे एसटीच्या तिजोरीत २५ लाखांची भर
By admin | Published: November 20, 2014 11:21 PM