Join us

बीअरच्या चिअर्समध्ये ठाणेकर टॉपर

By admin | Published: July 18, 2014 12:04 AM

राज्याच्या अबकारी खात्याने तयार केलेल्या मद्यविक्रीच्या अहवालाच्या आकडेवारीत बीअर प्राशनामध्ये ठाणेकरांनी टॉपरचे स्थान पटाकवले आहे.

ठाणे : राज्याच्या अबकारी खात्याने तयार केलेल्या मद्यविक्रीच्या अहवालाच्या आकडेवारीत बीअर प्राशनामध्ये ठाणेकरांनी टॉपरचे स्थान पटाकवले आहे. ठाणेकरांनी गतवर्षात ७.४९ लाख बल्क लीटर बीअर ढोसली. त्याखालोखाल मुंबईकरांनी ६२९.५१ लाख, तर नाशिकने ५.०६ लाख बीअरसह अनुक्रमे दुसरे, तिसरे स्थान पटकाविले. सध्या लाइफ स्टाइल स्टेट्स समजल्या जाणाऱ्या वाईनची सर्वाधिक विक्री औरंगाबादमध्ये झाली असून, तिच्या विक्रीत या वर्षात ८१.७२ टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे हिंगोली, बुलढाणा, उस्मानाबाद हे मराठवाड्यातील तालुके वाईन विक्रीवाढीत दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. नाशिक ही वाईनची राजधानी असली तरी वाईन पिण्यात तिचे स्थान पाचवे आहे. या वर्षात महाराष्ट्रात ५०.५६ लाख बल्क लीटर वाईनची विक्री झाली.९० रुपयाला मिळणारी स्ट्राँग बीअर आता ११० रुपयांना मिळते. चिल्ड असेल तर ती १२०-१२५ला जाते; तर वाईन ९९ रुपयांना उपलब्ध आहे. उत्तम दर्जाची वाईन ५०० रुपयांना मिळते. या दरांचाही विक्रीवर परिणाम झाला आहे. (विशेष प्रतिनिधी)