ठाणे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक १०७ कोटींचे
By Admin | Published: March 27, 2015 11:00 PM2015-03-27T23:00:08+5:302015-03-27T23:00:08+5:30
जिल्हा परिषदेने २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १०७ कोटी ५६ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये घेतलेल्या सुमारे १२ नाविण्यपूर्ण योजनांमध्ये दरिद्री नारायणाच्या विकासाकरीता सात योजना आहेत.
सुरेश लोखंडे ल्ल ठाणे
जिल्हा परिषदेने २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १०७ कोटी ५६ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये घेतलेल्या सुमारे १२ नाविण्यपूर्ण योजनांमध्ये दरिद्री नारायणाच्या विकासाकरीता सात योजना आहेत. त्यावर १३ कोटी खर्च होणार आहेत.
यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनाना स्थान न देता सर्वागिण हित व कौशल्यावर आधारीत योजनांना प्राधान्याने घेण्यात आल्या आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी अंदाजपत्रकाविषयी पत्रकारांना माहिती दिली.
यामध्ये ‘कृृति आधारीत अध्यायन’ या योजनेसाठी आठ कोटी जि.प. शाळेच्या ४ थी व ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षाला बसविण्यासाठी प्रत्येकास पुस्तके, प्रश्न संच देण्यात येणार असून परीक्षा शुल्कही भरले जाणार आहे. जितक्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळेल, तितक्याच अन्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ६० लाख, प्रत्येक माध्यमिक शाळेत विज्ञान विषयक दृष्टीकोण व आवड निर्माण करण्यासाठी ३० लाखांची तरतूद आहे.
मागासवर्गीयाना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार असून मुंबई विद्यापिठाशी सलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये विविध प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरले जाणार आहे. एमएससीआयटी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थीनींसह मागासवर्गीय विद्यार्थ्याना परीक्षा शुल्क परत दिले जाणार आहेत.
अंगणवाडीचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी सुमारे एक कोटी ३७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दहावीत गुणवत्तेने उत्तीर्ण होण्यासाठी एससी, एसटी विद्यार्थी ९ वी उत्तीर्ण होताच जिल्ह्यात ठिकठिकाणी समर व्हेकशनच्या धर्तीवर निवासी वर्ग सुरू केले जाणार. यासाठी १५ लाखांची तरतूद असली तरी गरजेनुसार अधिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
सर्वागिण विकासाच्या दृष्टीने अपंगांना शिक्षण देण्यासाठी एक कोटी ३७ लाख खर्च केले जाणार आहे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी दहा लाख रूपये खर्च होणार आहेत. तळागाळातल्यांच्या कल्याणाचा प्रभाव या अंदाजपत्रकावर असल्यामुळे ‘दरिद्री नारायणाच्या दारी साक्षात सरस्वती उभी’ करणारे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेने तयार केले आहे.
४ गावतलाव सुशोभिकरण, दुरूस्तीसाठी ९८ लाख,
४जलयुक्त शिवारच्या २६ गावांसह अन्य गावांसाठी चार कोटी १३ लाख
४ गरोधर मातांची मोफत सोनाग्राफीव सर्व चाचण्यांसाठी एक कोटी २५ लाख
४ बचत गटाना देण्यात येणाऱ्या भात रोवणी यंत्रासाठी ३० लाख
कृषी मोबाईल व्हॅनसाठी २५ लाख
४जि प. च्या स्वउत्पन्नातून १०७ कोटी येतील :-
१) मुद्रांक शुल्कव्दारे ९२ कोटी
२) उर्वरित ११ कोटी कर, उपकर व स्थानिक करांव्दारे
३) ठेवीव्दारे चार कोटी
४प्राप्त उत्पन्नातून खर्चाची तरतूद :-
१) शिक्षणासाठी नऊ कोटी ४१ लाख
२) सार्वजनिक बांधकाम ११ कोटी
३) पाटबंधारे ७ कोटी
४) आरोग्य २ कोटी
५) पाणी पुरवठा १ कोटी २७ लाख
६) कृषीसाठी ५ कोटी पशुसंवर्धन दोन कोटी २७ लाख
७) समाजकल्याणसाठी १२ कोटी
८) महिला बालकल्याणसाठी ५ कोटी ६५ लाख