Join us  

ठाण्याच्या महासभेत आज पाणी पेटणार

By admin | Published: March 19, 2016 12:20 AM

ठाणे शहराला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, पालिकेचे नियोजन नसल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधक आता आक्रमक झाले असून लक्षवेधीच्या माध्यमातून प्रशासनाला

ठाणे : ठाणे शहराला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, पालिकेचे नियोजन नसल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधक आता आक्रमक झाले असून लक्षवेधीच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारणार आहेत. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीतही पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. परंतु, प्रशासनाकडून अपेक्षित असे उत्तर न मिळाल्याने महासभेत प्रशासनाला धारेवर धरण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्या दालनातील गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.आघाडी सरकारने २००३ मध्ये शाई धरण मंजूर केले असतानाही पालिकेने उदासीनता दाखवून स्वस्तात मिळत असलेला हक्काचा पाण्याचा स्रोत घालवला आहे. त्यामुळेच नागरिकांवर आज पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली . ठाणे शहरात अनेक नवीन बांधकामे सुरू असून त्यातून निर्माण होणाऱ्या हजारो नवीन सदनिकांना पालिका पाणी कसे पुरवणार आहे, असा प्रश्न काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.